सुष्मिता सेननं दत्तक घेतलं तिसरं मुल?

सुष्मितानं टीकाकारांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं.   

Updated: Jan 13, 2022, 11:17 AM IST
सुष्मिता सेननं दत्तक घेतलं तिसरं मुल? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen)ही स्वत:च्या सिद्धांतांवर आयुष्य जगणाऱ्यांपैकी एक आहे. आतापर्यंत तिनं जीवनात घेतलेल्या बऱ्याच मोठ्या निर्णयांनी चाहत्यांपुढे आदर्श प्रस्थापित केला आहे. एकल मातृत्त्वापासून कारकिर्दीत गाठलेल्या उंचीपर्यंत प्रत्येक वेळी सुष्मितानं टीकाकारांच्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं. 

वयाच्या पन्नाशीकडे वाटचाल करणारी ही अभिनेत्री जीवनात येणाऱ्या प्रत्येक वादळावर टिच्चून उभी राहण्यासाठी ओळखली जाते. 

अविवाहित असूनही सुष्मिता दोन मुलींची आई आहे. रिनी आणि अलिशा अशी तिच्या या दोन मुलींची नावं.

फार आधीच तिनं या दोन्ही मुली दत्त घेतल्या होत्या. सध्या या मुली सुष्मिताचा आधार आहेत. 

आता म्हणे सुष्मिता सेन हिनं तिसरं मुलही दत्तक घेतलं आहे. अद्यापही सुष्मिताकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

पण, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमुळे अनेकांनाच हा प्रश्न पडत आहे की, हा सुष्मिताचा मुलगा तर नाही? 

सुष्मिता यावेळी एका ठिकाणहून तिच्या दोन्ही मुलींसोबत बाहेर पडताना दिसली. ज्यानंतर एका लहान मुलावर सर्वांच्या नजरा खिळल्या. 

माध्यमांच्या प्रतिनिधींनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत हा अभिनेत्रीचा मुलगा असल्याचं म्हटलं आहे. 

तेव्हा आता हा खरंच सुष्मिताचा मुलगा असल्याच हे तिनं दत्तक घेतलेलं तिसरं मुल ठरणार आहे. 

2000 साली सुष्मितानं रिनीला दत्तक घेतलं होतं. ज्यानंतर 2010 मध्ये तिनं अलिशाला दत्तक घेतलं. कुटुंब पूर्ण करणारी ही किलबिल सुष्मिताची ताकद बनली. 

काही काळापूर्वीच रोमन शॉल याच्यासोबतच्या तिच्या नात्याला पूर्णविराम मिळाला. जे पाहता सुष्मितासाठी तिच्या मुलीच या काळात तिला धीर देत असल्याचं पाहायला मिळालं. 

प्रेमाचं नातं तुटलं असलं तरीही रोमन आणि सुष्मिताची मैत्री मात्र कायम आहे.