#BoycottThappad : तापसीचा 'थप्पड' वादाच्या भोवऱ्यात

प्रदर्शनापूर्वीच सिनेमाला कडाडून विरोध 

Updated: Feb 28, 2020, 10:14 AM IST
#BoycottThappad : तापसीचा 'थप्पड'  वादाच्या भोवऱ्यात  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा 'थप्पड' सिनेमा सिनेमाघरात रिलीज झाला आहे. समिक्षकांनी सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. एक पत्नी आपल्या पतीकडून कानाखाली खाल्यावर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेते या कथेवर तापसीचा हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमाचं कौतुक होत असलं तरीही तिच्यासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. 

सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच सिनेमाला सोशल मीडियावर विरोध होताना दिसत आहे. #BoycottThappad हा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे. या मागचं कारण म्हणजे निर्माता-दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी घेतलेली सीएए आणि एनआरसीविरोधातील भूमिका. तसेच अभिनेत्री तापसी पन्नूने मुंबईत सीएए आणि एनआरसी विरोधातील निदर्शनात सहभागी झाली होती. 

या दोन्ही कारणांमुळे सिनेमाला सोशल मीडियावर कडाडून विरोध होत आहे. #BoycottThappad हा ट्रेंड सुरू झाला आहे. ट्विटरवर सिनेमा विरोधात आवाज उठवला जात आहे. अनेक युझर्सनी या विरोधात आपली मत मांडली आहेत. 

हा सिनेमा आज 28 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. मुंबई एनआरसी आणि सीएए विरोधात निदर्शन झाली. या विरोधात रॅली काढण्यात आली. यामध्ये अनुराग कश्यप, दिया मिर्झा आणि इतर कलाकारांसोबत तापसीने देखील सहभाग घेतला होता. मध्य प्रदेश सरकारने तापसीचा हा सिनेमा तीन महिने टॅक्स फ्री करण्यात आला आहे. या सिनेमात घरगुती वाद दाखवण्यात आले आहेत. पुरूषार्थ महिलांच्या जीवनावर किती विपरित परिणाम करतो. हे यामध्ये दाखवण्यात आलं आहे.