Shocking : तैमूरच्या अशा कल्पनांनी सैफ अली खानच्या जीवाला घोर

 तैमूर अली खान लोकांचा फेवरेट स्टार किड आहे.

Updated: Nov 17, 2021, 05:21 PM IST
Shocking : तैमूरच्या अशा कल्पनांनी सैफ अली खानच्या जीवाला घोर title=

मुंबई : बॉलिवूडचं लाडकं कपल करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान लोकांचा फेवरेट स्टार किड आहे. तो नेहमी क्यूटनेसमुळे लोकांकडून कौतुकाची थाप मिळवत असतो. मात्र आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल अशी एक गोष्ट सांगणार आहोत की,  जे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. होय! तैमूर बँक लुटण्याविषयी आणि पैसे चोरण्याच्या गोष्टी करायचा. सैफने या गोष्टी राणी मुखर्जी सोबत बोलताना सांगितल्या

बॅड बॉय बनायचं आहे तैमूरला
तैमूरचे वडिल सैफ अली खानने त्याला घेवून काही इंट्रेस्टिंग वक्तव्य केलं आहेत. सैफने सांगितलं की, जेव्हा तैमूरने त्याची फिल्मचे काही सिन्स पाहिल्यावर तो नकली तलवार घेवून सगळ्यांना पळायला लावायचा. जेव्हा सैफ त्याला समजवायचा हा सिनेमातील गुड बॉय आहे. तेव्हा तो म्हणायचा मला बॅड बॉय बनायचं आहे. राणी त्याच्या या गोष्टी ऐकून हसू लागली. आणि म्हणाली, त्याच्यासाठी आता हे करणंच बेस्ट आहे.

खूप हसली राणी मुखर्जी
मुख्य म्हणजे सैफ अली खानने यश राज फिल्म्सच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सैफ अली खान  'बंटी और बबली 2' ची को-स्टार राणी मुखर्जीसोबत बोलताना म्हणाला, या चित्रपटानंतर तैमूर म्हणायचा की, 'मला वाईट व्यक्ती बनायचं आहे आणि बँक लुटायची आहे, सर्वांचे पैसे चोरायचे आहेत.' हे ऐकून राणीला हसू फुटतं.