तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाचा 'रॉयल लूक'

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुरचा आज पहिला वाढदिवस आहे.

Updated: Dec 20, 2017, 04:02 PM IST
तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाचा 'रॉयल लूक'  title=

मुंबई : सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुरचा आज पहिला वाढदिवस आहे.

गेल्या वर्षभरात तैमुरचे अनेक फोटो इंटरनेटवर वार्‍यासारखे पसरले. 

सोशल मीडियावरही तैमुरच्या क्युट फोटोंनी अनेकदा धुमाकूळ घातला आहे. आज पहिल्या वाढदिवसादिवशी देखील पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज झालेल्या तैमुरच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. 

पतौडी पॅलेसमध्ये सेलिब्रेशन  

सैफिना सध्या पतौडी पॅलेसमध्ये आहेत. तेथेच तैमुरच्या बर्थडेचं सेलिब्रेशन होणार आहे. निळ्या रंगातील शर्टातील तैमुर आणि गॉगल या कॉम्बिनेशनमधील तैमुरचा फोटो फारच क्युट आहे. 

 

 

Awww...Look at this little cutie 

A post shared by Taimur Ali Khan Pataudi (@taimuralikhanpataudi_) on

 

बॉलिवूडने दिल्या तैमुरला शुभेच्छा 

तैमुरच्या पहिल्या वाढदिवशी करण जोहर, करिष्मा कपुर यांनी तैमुरचे खास फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

घरगुती सेलिब्रेशन 

तैमुरच्या वादिवसाला करण जोहर त्याच्या मुलांसह  उपस्थित राहणार आहे तर सोबतच शाहरूख खान आणि सैफिनाच्या जवळच्या काही व्यक्ती तैमुरच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी पतौडी पॅलेसमध्ये हजर राहणार आहेत.  

काही दिवसांपूर्वी सैफिना पतौडी पॅलेसमध्ये पोहचले आहेत.  काही दिवसांपूर्वी सैफ अली खान सोबत तैमुरनेही घोडेस्वारीचा आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेतला आहे.