मुंबई : तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा अनेक काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. खरंतर हे दोघेही एकमेकांना एका रिएलीटीशो दरम्यान भेटले. हा शो संपला तरी देखील हे दोघेही एकमेकांसोबत पाहिले गेले आहेत. तेजस्वी आणि करण यांनी एकमेकांवरील असलेलं प्रेम कधीही कोणापासून लपवून ठेवलेलं नाही. या जोडप्याला चाहत्यांनी देखील पसंती दर्शवली आहे. हे जोडपं नेहमीच सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडलेले आहेत की, ते त्यांचे प्रेम कुठेही आणि कधीही व्यक्त करतात.
आता पुन्हा एकदा हे जोडपं चर्चेत आलं आहे, ते त्यांच्या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे.
खरं तर करण कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तेजस्वीच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तेजस्वीने मेहंदी लावली आहे. तसेच तिने त्यावर करणच्या नावाचे पहिले अक्षर बनवले जाते. हा फोटो शेअर करत करणने 'कैसे मुझे तुम मिल गई' हे गाणं शेअर केले आहे.
करण कुंद्राने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
करणने शेअर केलेल्या या फोटोमुळे अनेकांना असा प्रश्न पडला आहे की, हे दोघेही लग्न बंधनात अडकणार आहेत का? तेजस्वीच्या हातावर लागलेली मेहेंदी हे त्यांच्या लग्नाचे संकेत आहे. परंतु अशी दोघांकडून अशी कोणतीही घोषणा झालेली नाही. कदाचित फक्त आवड म्हणून किंवा आपलं प्रेम सिद्ध करण्यासाठी तेजस्वीने आपल्या हातावर मेहंदी काढली असावी.