मुंबई : इन्टरनेट सेंसेशन ठरलेल्या रानू मंडल आता प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत सामाविष्ट झाल्या आहेत. रानू मंडल यांच्या विषयीच्या काही चर्चा कित्येक दिवसांपासून वाऱ्यासारख्या पसरत आहेत. तब्बल १० वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात सोनेरी दिवस आला आहे. पश्चिम बंगालच्या रानाघाट रेल्वे स्थानकावर त्या गात असायच्या. लता मंगेशकर यांच्या 'एक प्यार का नगमा हैं' या गाण्याने त्यांच्या नशिबाचा दरवाजा उघडला. आणि त्यांच्या बॉलिवूडच्या प्रवासाला सुरूवात झाली.
गायक हिमेश रेशमिया त्यांच्यासाठी गॉड फारद ठरल्याचे म्हणायला काही हरकत नाही. त्यानेच रानूंना बॉलिवूड मध्ये एन्ट्री दिली. सध्या तो त्याच्या आगामी 'हॅपी हार्डी और हीर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने रानू मंडल विषयी संवाद साधला.
'माझ्या चित्रपटातील ६ गाणे प्रदर्शित झाले होते. राहिलेल्या गाण्यांसाठी मी योग्य वेळेच्या शोधात होतो. मी चित्रपटासाठी एका फिमेल आवाजाच्या प्रतिक्षेत होतो. जो रूपेरी पडद्यावर चाहत्यांना मंत्रमुग्ध करण्यात यशस्वी ठरेल. त्याच वेळी रियालिटी शोमध्ये त्याचं आगमन झालं आणि माझ्या चित्रपटासाठी हाच आवाज योग्य असल्याचं माझ्या लक्षात आले.' अशाप्रकारे रानूंना हिमेशच्या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली.
दुसऱ्या दिवशी लगेच त्याने रानूना फोन करून संवाद साधला आणि 'तेरी मेरी' गाण्याला रानूंचा स्वरसाज लाभला. त्यानंतर त्यांना अनेक ऑफर्स देखील मिळाल्याचे समोर आले. रानू यांचा आवाज आता फक्त बॉलिवूड पर्यंत मर्यादित राहिलेला नसून त्यांना दाक्षिणात्य चित्रपटांमधून सुद्धा ऑफर्स मिळत आहेत.