मुंबई: आपल्या अभिनयाने मनोज बाजपेयीने प्रत्येकाला स्वतःच वेड लावलं आहे. या अभिनेत्याच्या कथेत कठोर परिश्रम, संघर्ष आणि कधीही हार न मानणे यांचा समावेश आहे. मनोज बाजपेयी यांचं नाव आज बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांमध्ये मोडलं जातं. मनोज बाजपेयी यांनी दिल्ली येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.
राम गोपाल वर्मा यांच्या 'सत्य' या क्लासिक ड्रामा फिल्ममधून मनोज बाजपेयी यांना खरी ओळख मिळाली. त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त मनोज बाजपेयींची प्रेमकथासुद्धा चर्चेत होती. मनोज बाजपेयी यांनी दोन लग्न केली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार मुंबईत येण्यापूर्वी मनोज बाजपेयी यांनी दिल्लीत एका मुलीशी लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नानंतरही हे नात फार काळ टिकू शकलं नाही आणि या दोघांचा घटस्फोट झाला
मनोजने स्ट्रगलच्या पहिल्या दिवसांत पहिलं लग्न केलं होतं. त्यानंतर मनोज दिल्ली सोडून मुंबई येथे नशीब आजमावण्यासाठी आला. मुंबईत त्याची भेट अभिनेत्री नेहाशी झाली. 'करीब' चित्रपटामुळे नेहा आणि मनोज बाजपेयींची जवळिकता वाढली होती. एकमेकांना डेट केल्यानंतर 2006 साली या दोघांनी लग्न केलं. नेहाचे खरं नाव शबाना रझा आहे.
फेब्रुवारी २०११ मध्ये या दोघांना एक मुलगी झाली, ज्याचे नाव त्यांनी अवा नैला असं ठेवलं. आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलताना मनोज बाजपेयी यांनी खुलासा केला की, 'आम्ही घरात अडीच माणसे राहतो शबाना, अवा आणि मी. जेव्हा माझी पत्नी बिझी असते, तेव्हा मी अवाला संभाळतो. तिचा जन्म झाल्यानंतर मी कधीही शहराबाहेर गेलो नाही.