First Indian Female Singer who become crorepati : कला क्षेत्र असं आहे ज्यात प्रत्येक दिवशी आपल्याला काही वेगळं पाहायला मिळतं. गाण्याचं नवं रुप आणि त्यातही वेगवेगळे जॉनरा आपल्याला ऐकायला मिळतात. जवळपास 100 वर्षांपूर्वी गाणी आणि त्यातल्या त्यात गाणी रेकॉर्ड करण्याची पद्धत सुरु झाली होती. भारतातील एक अशी सुपरस्टार सिंगर ज्यांचा मधुर आवाज सगळ्यात पहिले रेकॉर्ड करण्यात आला होता. त्यांचं नाव गौहर जान असं आहे. 1903 मध्ये देशातलं पहिलं गाणं रेकॉर्ड झालं असून आता त्या रेकॉर्डिंगला 111 वर्षे पूर्ण झाली आहेत.
गौहर जान यांचा आवाज इतका सुंदर होता की त्यांच्या निधनाच्या तब्बल 96 वर्षांनंतर देखील त्यांचा आवाज अमर आहे असं म्हणता येईल. त्या इतक्या मोठ्या गायिका होत्या, ज्या काळात 20 रुपये तोळं सोनं मिळायचं, तेव्हा गौहर जान या 3 हजार रुपये एका शोचं मानधन घ्यायच्या. गौहर जान जिथेही जायच्या तिथे सोनं-चांदीचा पाऊस होऊ लागायचा. गौहर यांचा आवाजाच्या प्रेमात राजा महाराजांपासून सगळेच होते.
इतका सुंदर आणि मधूर आवाज असणाऱ्या गौहर जान यांनी संगीताचं शिक्षण हे कोठ्यात घेतलं होतं. तर गौहर जान या बॉलिवूडच्या पहिल्या महिला करोडपती देखील ठरल्या होत्या. त्याशिवाय त्या एकमेव महिला होत्या, ज्यांच्याकडे त्यावेळचे राष्ट्रपती महात्मा गांधी यांनी मदत मागितली होती.
गौहर यांचा जन्म 26 जून 1873 मध्ये उत्तर प्रदेशच्या आजमगढ शहरात झाला होता. गौहरचे वडील आर्मेनिय देशातील होते. गौहर यांच्या आईचं नाव व्हिक्टोरिया होतं. गौहर यांच्या वडिलांनी व्हिक्टोरिया यांना सोडल्यानंतर, व्हिक्टोरिया यांनी खुर्शीद नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीशी लग्न केलं. गौहर यांची आई कोठ्यात गाणी गायची. तिथे रोज संध्याकाळी गाणी गाण्याचा कार्यक्रम व्हायचा. तिथेच गौहर जान यांनी त्यांच्या आईकडून संगीताचं शिक्षण घेतलं. गौहर यांना असलेली संगीताची आवड आणि त्यांचा मधूर असा आवाज पाहता त्यांच्या आईनं देशातील नामवंत संगीत शिक्षकांकडून त्यांचे शिक्षण केले.
गौहर जान वयाच्या 14 व्या वर्षी जेव्हा कोलकाताच्या एका कार्यक्रमात गाणं गात होत्या. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या दरभंगाचया महाराजांना त्यांचा आवाज फार आवडला. त्यांनी गौहर यांच्यावर खूप पैसे उडवले. हळूहळू गौहर या संगीत जगातल्या सुपरस्टार झाल्या. एका कार्यक्रमासाठी त्या 3 हजार रुपये मानधन घ्यायच्या.
हेही वाचा : 72 व्या वर्षी झीनत अमान कोणाला करतायत डेट? व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्तानं केला खुलासा
1902 मध्ये पहिल्यांदा कोणाचा आवाज ग्रामोफोनवर रेकॉर्ड करण्यात आला होता आणि तो होता गौहर जान यांचा. त्याआधी सर्वसामान्य लोकांना गौहर जान यांचा आवाज ऐकायला मिळाला नव्हता. गौहर खान यांनी गाणी रेकॉर्ड करायला जेव्हा सुरु केली त्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये गाणी गावी अशी इच्छा जाहिर केली. त्यानंतर 1902 पासून 1920 पर्यंत गौहर जान यांनी 600 पेक्षा जास्त गाणी गायली होती आणि ते देखील वयाच्या 18 व्या वर्षापर्यंत. ही 600 गाणी वेगवेगळ्या भाषेत आहेत.