'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!

बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांच्या आगामी चित्रपट 'आझाद'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अमन आणि राशाची एक दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोन्ही स्टार किड्सच्या अभिनयाची क्षमता प्रेक्षकांना प्रभावित करणारी आहे.    

Intern | Updated: Jan 7, 2025, 05:05 PM IST
'आझाद' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च: चित्रपटात अमन आणि राशाची दमदार केमिस्ट्री, एकदा बघाचं!   title=

अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची मुलगी राशा थडानी यांचा चित्रपट 'आझाद' लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. ट्रेलरमध्ये दोन्ही कलाकारांची भूमिकाही आकर्षक आणि उत्सुकतेला वाढवणारी आहे. 'आझाद' हा चित्रपट त्यांच्या अभिनय आणि चित्रपटाच्या पटकथेच्या अनोख्या दृष्टीकोनामुळे चर्चेत आहे.  

चित्रपटाची कथा ब्रिटिश राजाच्या काळातील भारतातील एक डाकू आणि घोड्याच्या नातेसंबंधावर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगण 'डकैत विक्रम सिंग'च्या भूमिकेत दिसणार आहेत. अमन देवगण घोडेपालकाच्या भूमिकेत असून, राशा थडानी राजकुमारीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची मुख्य कथा घोडा 'आझाद' आणि त्याच्या मालकाच्या नात्यावर आधारित आहे.  'आझाद' च्या ट्रेलरमध्ये घोड्याच्या संवेदनशीलतेसह, अमन देवगणच्या घोड्याबद्दल असलेल्या जिव्हाळ्याची छाप आहे. अमन आणि राशाच्या भूमिकेतील केमिस्ट्री खूपच आकर्षक आहे.  

चित्रपटाची कथा ब्रिटीश काळातील एक संवेदनशील आणि खूपच प्रभावी घटना आहे. ब्रिटिश अधिकारी भारतीय मजुरांना दक्षिण आफ्रिकेत हलवण्याचा प्रयत्न करत असतात.तेव्हा एक डाकू आपल्या लोकांना त्यांच्यापासून वाचवतो. या महत्त्वपूर्ण लढाईत 'आझाद' घोड्याची भूमिका कशी असणार, हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.  'आझाद' चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर यांनी केले आहे. अभिषेक कपूर यांचा 'रॉक ऑन' आणि 'काई पो चे' सारख्या यशस्वी चित्रपटांचा मागोवा घेतल्यावर, त्याच्या दिग्दर्शनाची शैली आणि सिनेमा कलेवरची पकड मोठ्या प्रमाणावर ओळखली जाते.  अमन देवगणने त्याच्या काका अजय देवगणसोबत काम करताना त्याच्यावर असलेल्या दबावाबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की,'अजय काका खूप प्रेमळ आणि आनंदी व्यक्ती आहेत, पण ते कामाच्या बाबतीत खूप कठोर आणि प्रामाणिक आहेत. काकासोबत काम करताना मी खूप नर्व्हस होतो, परंतु त्यांच्यामुळेच मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.'

हे ही वाचा: शाहिद कपूरचा 'देवा' : बॉक्स ऑफिसवर 'सिंघम'ला टक्कर देणारा एक नवा सुपरहिरो?

राशा थडानीने 'आझाद' च्या गाण्यांमध्ये असलेल्या जबरदस्त नृत्याचे प्रदर्शन देखील केले आहे, ज्यामध्ये तिच्या डान्स स्टेप्सने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'ऊई अम्मा' गाण्यात तिने केलेल्या नृत्याने तिच्या अभिनयाच्या नवीन क्षमतांची ओळख केली आहे. अनेक नेटकऱ्यांनी राशा थडानीला कतरीना कैफसारखी दिसत आहे अश्या कमेंट्स देखील केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ह्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोन्ही कलाकारांची जबरदस्त केमिस्ट्री आणि त्यांचे अभिनयाचे कौशल्य प्रेक्षकांना निश्चितच चांगलेच प्रभावित करेल. चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे आणि या चित्रपटामुळे दोन्ही स्टार किड्सच्या करिअरमध्ये नवे वळण येण्याची शक्यता आहे.