Photo मध्ये दिसणारी ही मुलगी आहे बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का?

आईच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Updated: Jul 30, 2022, 08:02 PM IST
Photo मध्ये दिसणारी ही मुलगी आहे बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री, तुम्ही ओळखलं का? title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड किड्सचे फोटो व्हायरल होत असतात. पण कधी कधी बॉलिवूडच्या स्टार कलाकारांचे लहानपणीचे फोटो देखील व्हायरल होत असतात. आता आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आईच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचे आई-वडील देखील साऊथमधील चित्रपटांत मोठे स्टार आहेत. त्यांनी अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले. पण ही मुलगी आता 67 वर्षांची झाली आहे. 

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री आज सदाबहार अभिनेत्री आहे. जिला पाहून तिच्या सौंदर्याचे रहस्य काय असा प्रश्न लोकांना पडतो. जर तुम्ही अद्याप या मुलीला ओळखू शकले नसाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की हा फोटो प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचा आहे. रेखा यांचा हा बालपणीचा फोटो चांगलाच व्हायरल झालाय. फोटोमध्ये रेखा यांनी आई अभिनेत्री पुष्पवल्ली त्यांना आपल्या मांडीवर घेऊन बसली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dil Cheez Kya Hai(@rekhajiunofficial)

रेखा या बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनेत्री असण्यासोबतच त्या राज्यसभेच्या खासदारही राहिल्या आहेत. रेखा बॉलिवूडमधील त्यांच्या कामामुळे चर्चेत राहिल्या. वैयक्तिक आयुष्यही चर्चेत राहिले. आई-वडील यांचे जीवन देखील बरेच वादग्रस्त होते. आई-वडिलांच्या वाईट नात्याचा परिणाम त्यांच्या बालपणावर आणि आयुष्यावर कुठेतरी दिसत होता. रेखा यांची आई पुष्पवल्ली यांनी रेखा आणि राधा या दोन मुलींना जन्म दिला.

रेखा यांचे खरे नाव भानुरेखा गणेशन आहे आणि त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी झाला होता. रेखा बॉलिवूड चित्रपटातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. रेखाने बाल कलाकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीला तेलगू चित्रपट रंगुला रत्नममधून सुरुवात केली. 2010 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. रेखाच्या आईचे नाव पुष्पावली आणि वडील जेमिनी गणेशन हे साऊथचे स्टार होते.