मुंबई : हॉलिवूड स्टार टॉम क्रूझ, ज्याने चित्रपटांमध्ये थरारक स्टंट करून अनेकांचं मन जिंकलं आहे. पण या अभिनेत्याच्या गाडी चोरांनी पळवली आहे. जेव्हा त्याला कळाले की त्याची गाडी चोरीला गेली आहे, तेव्हा तो स्तब्ध झाला. विशेष गोष्ट म्हणजे टॉमच्या मौल्यवान वस्तू ज्या गाडीमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. ते देखील चोरीला गेल्या आहेत. ही घटना घडली जेव्हा अभिनेता बर्मिंगहॅममध्ये त्याच्या 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटाचे शूटिंग करत होता.
द सनने रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हाय-टेक चोरांनी स्कॅनरचा वापर करून की-लेस एंट्री नसलेल्या कारचे इग्निशन फोब सिग्नल क्लोन केले. ही कार बर्मिंघममधील ग्रँड हॉटेलच्या बाहेर उभी होती. जेथे टॉम क्रूझ 'मिशन इम्पॉसिबल 7' चित्रपटाचे शूटिंग करत होते.
इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग डिव्हाइससह सुसज्ज असल्यामुळे कार पोलिसांनी जप्त केली आहे. टॉम त्याच्या बॉडीगार्डच्या बीएमडब्ल्यूसह बर्मिंघममध्ये प्रवास करत होता. 1,00,000 पौंड (एक कोटी रुपयांपेक्षा जास्त) वस्तू या कारमध्ये होत्या. अभिनेता आणि त्याच्या बॉडीगार्डच्या हे लक्षात ही आले नाही की, त्यांची कार चोरांनी पळवून नेली आहे. कार जप्त केली असली तरी त्यातील वस्तू मिळालेल्या नाहीत.
टॉम त्याच्या सुरक्षा टीमवर नाराज झाला आहे. टॉम क्रूझला जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा तो खूप रागावला. त्याने त्याच्या अंगरक्षकालाही फटकारले. ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रत्येकाच्या मनात तेच प्रश्न उपस्थित होत आहेत की अशा आलिशान हॉटेल समोरून गाडी कशी चोरी झाली आणि कोणाला कळलेच नाही ? जेथे टॉम शूट करतो, तिथे प्रचंड सुरक्षा असते, मग चोरांनी गाडी चोरी केली कशी?
टॉमचा अंगरक्षक, जो अभिनेत्याच्या सुरक्षा कर्मचाऱ्याचाही प्रभारी आहे, त्याला बुधवारी पार्किंगच्या जागेत बीएमडब्ल्यू एक्स 7 नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. वेस्ट मिडलँड पोलीस मुख्यालयापासून 2 मिनिटांच्या अंतरावर ही चोरी झाली. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी आम्हाला बर्मिंघममधील चर्च स्ट्रीटमधून बीएमडब्ल्यू एक्स 7 चोरी झाल्याची माहिती मिळाली. थोड्या वेळाने स्मेथविक मध्ये कार सापडली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू आहे.
जेव्हा टॉमला या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्याच्यासह शूटिंगला उपस्थित असलेले प्रत्येकजण हैराण झाले. या चित्रपटात टॉमसोबत अभिनेत्री Hayley Atwell देखील आहे.