मुंबई : ‘तुंबाड’चा दिग्दर्शक आनंद गांधी लवकरच पुन्हा एक नवा प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांना थक्क करण्यास सज्ज झाला असून त्याचा हा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांसाठी नवा आश्चर्याचा धक्का देणार असेल. २०१८ मध्ये, आनंद गांधीच्या 'तुंबाड'ने भितीदायक पटकथेसह प्रेक्षकांना खरोखरच चकित केले होते. अचंबित करणारे लोकेशन्स आणि प्रेक्षकांचा थरकाप उडवून देण्याचे सर्व निकष या चित्रपटामध्ये होते. ‘मेमेसिस’ या त्याच्या प्रोजेक्टतर्फे यापूर्वी भारतात कधी साकारली गेली नाही अशी आगामी ‘ओके कॉम्प्युटर’ ही प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी वेब-मालिका घेऊन येत आहे. ही एक विज्ञान-कल्पनारम्य विनोदी वेबमालिका असून ती प्रेक्षकांना समांतर जगाच्या प्रवासावर घेऊन जाईल, जो फारच वेगवान असून यापूर्वी कधीही घडला नसेल.
प्रेक्षकांना 'शिप ऑफ थिसिस'सारख्या चित्रपटाची ओळख करून देत, आनंद आणि त्यांच्या टीमने महत्त्वपूर्ण भारतीय सिनेमाच्या नवीन पर्वाच्या अशा सादरीकरणाची स्थापना केली. चित्रपट इतका प्रभावी बनवणाऱ्या चर्चेला त्यांनी विचारांच्या विविधतेची जोड दिली. सिद्धांतापासून, आकर्षक जैविक प्रक्रिया आणि एखाद्या विचारसरणीने त्याच्या समर्थकांपासून स्वतंत्रपणे जगले पाहिजे की नाही या विषयावरील चर्चेतून त्याच्या चित्रपटाने अर्थपूर्ण आशयाची एक नवीन लाट आणली होती. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोठा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकण्यापासून ते आतापर्यंत भारताबाहेर सर्वाधिक पाहिली गेलेली डॉक्युमेंटरी म्हणून मान्यता मिळवण्यापर्यंत आनंद गांधींच्या ‘अॅन्सिग्निफिशंट मॅन’ ने इतिहास रचला आहे.
मानवी वाढीसाठी कल्पनाशक्ती ही नेहमीच प्रेरक शक्ती ठरली आहे. विकासवादी दृष्टीकोनातून, मानवाने केवळ त्याच्या बुद्धिमत्तेमुळेच जागतिक पातळीवर प्रगती गाठली आहे. प्राचीनकालीन अश्मयुग ते आधुनिक युगापर्यंत लागलेले विलक्षण शोध, मानवी बुद्धी आणि कल्पनाशक्तीच्या सामर्थ्याने विकसित होण्याने दृश्यमान आणि वैविध्यपूर्ण जीवनाशी जुळवून घेण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मानवजातीची आणखी एक निर्मिती, ज्याने आपल्या समाजातील उत्क्रांतीवर मोठा परिणाम केला आहे ती म्हणजे ‘सिनेमा’. समकालीन समाजातील चित्रपट उद्योग कदाचित सर्वात प्रभावी क्षेत्रांपैकी एक आहे जे आपल्या जगातील मतांचे विद्यमान भाषांतर प्रतिबिंबित करते. या विचार बदलांमध्ये योगदान देणारे दूरदर्शी निर्माते आहेत. असेच एक वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रांतिकारक चित्रपट निर्माते ‘आनंद गांधी’ ज्यांनी नेहमीच जागतिक प्रेक्षकांचे फक्त मनोरंजनच केले नाही तर त्यांच्या मनावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पाडणारा, विचार करण्याची शक्ती देणारा आशय आणि कल्पनाशक्ती जागृत करण्याची शाश्वती दिली आहे.
आपली सर्जनशीलता आणि अंत:प्रेरणा घेऊन आनंद गांधी आणि त्यांच्या टीमने भारतीय उपखंडामध्ये शॅसन - पॉलिटिकल स्ट्रॅटेजी बोर्ड गेम, जो बुद्धीबळानंतरचा भारतातील पहिला जागतिक टेबलटॉप एक्सपोर्ट गेम बनवला आहे आणि आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या जनसमुदाय मोहिमेच्या निमित्ताने भारतीय उपखंडात गेमिंगच्या नवीन युगाची स्थापना केली. ज्याची भारतीय इतिहासामध्ये सर्वाधिक लोकप्रिय गेम म्हणून नोंद झाली आहे. इंडीकेड २०१९ येथे अग्रगण्य उद्योग अधिवेशनात त्याला अत्यंत प्रतिष्ठित सोशल इम्पॅक्ट अवार्ड देखील प्राप्त झाला आहे.
आजच्या जागतिक चित्रपट निर्मितीच्या काळातील आनंद गांधीं यांची सर्जनशील ऊर्जा सामान्य प्रेक्षकाला हाताळण्यासाठी जड असली तरीही, अभूतपूर्व उत्पादन मूल्यांसह मूळ, विचारशील, मोहक करमणूक तयार करण्यापासून त्याने प्रेक्षकांना विस्मयकारक अनुभव आयुष्यभर देण्याची खात्री दिली आहे!