अबब...! Urfi Javed गरजूंना चक्क दिल्या 500 रुपयांच्या नोटा, व्हिडीओ व्हायरल

Urfi Javed  चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. उर्फीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्य झाले आहे तर अनेकांनी उर्फीला ट्रोल केले आहे. उर्फी नेहमीच तिच्या विचित्र कपड्यांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते बऱ्याचवेळा तिला ट्रोल करण्यात येतं तर कधी तिच्या हटके फॅशनची स्तुती होते. 

दिक्षा पाटील | Updated: May 14, 2023, 03:09 PM IST
अबब...! Urfi Javed गरजूंना चक्क दिल्या 500 रुपयांच्या नोटा, व्हिडीओ व्हायरल title=
(Photo Credit : Voompla)

Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. उर्फी ही तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेदचे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहतो. उर्फीची विचित्र फॅशन असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. उर्फीचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी तिच्या समोर असलेल्या गरजू मुलांना 500 च्या नोटा देताना दिसते. तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी तिची स्तुती केली आहे, तर काहींनी तिला ट्रोल केल आहे. 

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्प्लानं शेअर केला आहे. व्हिडीओत उर्फीनं लोकरीचे क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान केली आहे. तर त्यावर उर्फीनं गुलाबी रंगाचं ब्लेझर परिधान केलं आहे. या व्हिडीओत उर्फी एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना दिसते. त्यानंतर पापाराझींना फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी ती पोझ देताना दिसते. यावेळी उर्फीनं तिच्या मागे आलेल्या गरजूंना मदत करण्यासाठी चक्क 500 च्या नोटा दिल्या आहेत. तर तिच्याकडून परत पैसे मिळावे म्हणून एक मुलगा पुन्हा तिच्याकडे येतो तर त्याला ओरडत उर्फी बोलते अरे याला पैसे दिले आहेत. ये कितना कमीना है. हे पाहून सगळ्यांनाच आश्चर्य झालं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : आई नसती तर आज Siddharth Jadhav... 'तो' क्षण सांगत अभिनेता झाला भावूक

उर्फीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'कपडे कितीपण छोटे असू दे तिचं मन मोठं आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हे मस्त काम केलस. हे तर सेलिब्रिटीपण नाही करत त्यांना तू मागे सोडलं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ती गरजूंना पैसे देते ही चांगली गोष्ट आहे. हे ती का करते काय माहित... पब्लिसिटीसाठी की खरचं मदत करायची म्हणून, पण ती पैसे तरी देते त्यांना हे महत्त्वाचं आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ती एक चांगली व्यक्ती आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ड्रेसिंग कशीपण असू दे. पण तिचं मन खूप चांगलं आहे. दुसरे उगाच अॅटिट्यूड दाखवतात. काहींनी उर्फीला ट्रोल केले आहे.' एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'खूप पैसे वाटते... असं वाटतंय कोणी टीप दिली हिला म्हणून तिनं विचार केला की दुसऱ्यांनाच थोडी देते तेवढी पब्लिसिटी होईल.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'नक्की करते काय ही... इतके पैसे वाटते तर.