Uorfi Javed: सध्या उर्फी जावेद ही सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद (Urfi Javed vs Chitra Wagh) यांच्या मधला सुरू असताना आता उर्फीची एक आगळीवेगळी पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय. सध्या तिची ही पोस्ट सगळीकडे भलतीच व्हायरल होते आहे. परंतु नक्की तिच्या पोस्टमध्ये (Intstagram Post) असे काय आहे म्हणून उर्फी पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. सध्या या पोस्टमुळे उर्फी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्फी ही आपल्या वादग्रस्त पोस्टमुळे (Urfi Javed Story) कायमच चर्चेत असते. सध्या तिची अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे. आपल्या अंतरंगी फॅशनमुळे उर्फीला नेटकऱ्यांची टीका सहन करावी लागते आहे. त्याचमुळे आता उर्फीमुळे राजकीय वातावरणही तापलेलं दिसतं आहे. सोशल मीडियावर सध्या चित्रा वाघ vs उर्फी जावेद असं पेटलेलं रणांगण पाहायला मिळतं आहे. (urfi javed says she has allergy of wearing clothes here is why)
उर्फीनं नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिनं तिच्या पायांचा एक फोटो टाकला आहे. फोटोसोबत तिनं कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, मला कपड्यांची ऍलर्जी आहे. त्यासोबत तो फोटो शेअर करताना आपल्या पायांवर उठलेले पुरळही (Allergy) तिनं दाखवले. त्यामुळे आपल्याला कपडे घालून ही ऍलर्जी झाली असल्याचं या फोटोतून दर्शवलं आहे. तेव्हा आपण पुर्ण कपडे घातले तर आपल्या ऍलर्जी होते असं सांगत तिनं आपल्या आजाराबद्दल लिहिलं आहे. यावरून उर्फी पुन्हा ट्रोल झाल्याचं दिसतं आहे.
उर्फीनं हा फोटो आपल्या इन्टाग्राम स्टोरीत शेअर केला आहे. ज्यात तिनं आपलं उघडे पाय दाखवले आहेत आणि आपल्या पायावर उठलेल्या पुरळांवर तिनं फोटोतून दाखवलं आहे. त्याचसोबत त्या फोटोच्या वर कॅप्शनध्ये लिहिलं आहे की, मला कपड्यांची एलर्जी आहे. त्यामुळे मी कपडे घालत नाही.
उर्फी आपल्या फॅशन कायमच सगळ्यांना (Urfi Javed Fashion) धक्का देत असते. त्यामुळे तिची सर्वत्र जोरात चर्चा होत असते. कधी दगडांपासून ती ड्रेस तयार करते तर कधी तारेपासून. परंतु तिच्या या विक्षिप्त फॅशनची सर्वत्र चर्चा होत असते. सध्या उर्फी जावेद विरूद्ध भाजप नेत्या चित्रा वाघ हा वाद खूप जास्त विकोपा गेला आहे. त्यामुळे उर्फी सध्या जोरात चर्चेत आहे.
आपल्या या विक्षिप्त फॅशनमुळे ती चर्चेत तर होतीच पण त्याचसोबत आता आपल्या वादग्रस्त ट्विट्समुळेही उर्फी जोरात चर्चेत आली आहे. सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यासोबतचा वाद शिगेला पोहचला आहे.