मुंबई : चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अनेकवेळा अशा घटना कॅमेऱ्यात कैद होतात. ज्यानंतर स्टार्स युजर्सच्या निशाण्यावर येतात. असंच काहीसं वरुण धवनसोबत घडलं. कियारा अडवाणीसोबत वरुण त्याच्या 'जुग-जुग जीओ' या चित्रपटाचं प्रमोशन करत होता. यादरम्यान वरुणने कियाराला अशा ठिकाणी स्पर्श केला जो यूजर्सना अजिबात आवडला नाही. ज्यानंतर ते सोशल मीडियावर अभिनेत्याला प्रचंड ट्रोल करत आहे.
पूल किनारी देत होते पोज
या व्हायरल व्हिडिओमध्ये वरुण धवन कियारा अडवाणीसोबत पूलच्या बाजूला पोज देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पापाराझी दोघांना मध्यभागी येण्यास सांगतात. यानंतर कियारा पुढे सरकते. यादरम्यान वरुण धवन असं कृत्य करतो की तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतो.
या जागी केलं टच
पुढे व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, कियारा पुढे सरकताच वरुण तिला ब्रा लाईनच्या खाली पकडतो. अभिनेत्याने कियाराला स्पर्श करताच, कियारा हात काढून पुढे सरकते. वरुण धवनला पाहता, कियारा पूलमध्ये पडण्याची भीती त्याला वाटत होती. वरुण आणि कियाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यानंतर वरुण ट्रोलिंगचा प्रचंड सामना करावा लागत आहे.
अशा कमेंट करत आहेत युजर्स
एका यूजरने लिहिलं, 'मला समजत नाही की प्रमोशन दरम्यान हिरो जास्त प्रोटेक्टीव्ह का होतात. विनाकारण अभिनेत्रीचा हात पकडून असा स्पर्श केला. तर अजून एका यूजरने लिहिलं, 'वरूण धवन, थोडं नीट वाग. कियाराला हे आवडत नाही. तर अजून युजरने लिहिलं, 'तो सर्व हिरोईनला लग्नच नसल्यासारखं का स्पर्श करतो?'