नवी दिल्ली : सोशल मीडियात अनेकांना ट्रोल करण्यात येत असतं. याच ट्रोलरपैकी एकावर बॉलिवूड अभिनेत्री झरीन खान चांगलीच भडकली आहे. (व्हि़डिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
अभिनेत्री झरीनने म्हटल, बरं झालं माझी आई सोशल मीडियावर नाहीये. कारण, ज्या प्रकारे मला ट्रोल केलं जातं ते पाहून तिला धक्का बसला असता.
झरीन खानने म्हटलं की, "ट्रोल करताना जे काही म्हटलं जातं त्यामुळे केवळ आम्हाला त्रास होत नाही तर आमच्या मित्र परिवाराला, कुटुंबियांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे माझी आई सोशल मीडियावर नसल्याचा मला आनंद होत आहे. ज्या प्रकारच्या अपमानास्पद टिप्पणी होत असतात त्याचा आईला खूपच त्रास झाला असता".
अभिनेत्री झरीन खान सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. एमटीव्हीचा नवा शो 'एमटीव्ही ट्रोल पोलीस' मध्ये अभिनेत्री तापसी पन्नूचा एपिसोड पाहिल्यानंतर झरीनने या शो मध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता झरीन या शोमध्ये दिसणार आहे.
झरीन खान ज्या एपिसोडमध्ये दिसणार आहे त्याचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. अभिनेत्री झरीनने हा प्रोमो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत म्हटलं की, जर तुम्हाला काही बोलायचं आहे तर माझ्या तोंडावर बोला. एका युजरनेमचा सहरा घेत टीका करु नका.
या प्रोमोमध्ये झरीन खान एका ट्रोलरवर चांगलीच भडकली आहे. संतापलेल्या झरीनने रागाच्या भरात म्हटलं की, "एक कानशिलात मारु का आत्ताच्या आता..."
झरीनने आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "मी तापसीचा 'एमटीव्ही ट्रोल पुलीस' हा एपिसोड पाहिला. मला वाटतं की ही एक खूपच मोठी आणि चांगली गोष्ट आहे की ज्यांना विनाकारण ट्रोल करुन त्रास दिला जातो त्यांना एमटीव्ही मदत करत आहे. आपल्या समाजातील अनेकजण हे इंटरनेटचा आसरा घेत माझ्यासारख्यांना ट्रोल करतात. अशी लोक समाजासाठी धोकादायक आहेत".