Oscar 2025: कधी जाहीर होणार ऑस्कर 2025 पुरस्कार? नॉमिनेशनची 'ही' तारीख लक्षात ठेवा

यावर्षी म्हणजेच 2025 सालातील 97 व्या अकादमी पुरस्काराचे नामांकन हे 17 जानेवारीला जाहीर केले जाणार होते. मात्र, कॅलिफोर्निया येथील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीच्या भीषण घटनेमुळे हा दिवस पुढे गेला. आता या पुरस्काराच्या नामांकनाची नवी तारीख समोर आली आहे. जाणून घ्या, 'ही' तारीख.  

Updated: Jan 22, 2025, 11:25 AM IST
Oscar 2025: कधी जाहीर होणार ऑस्कर 2025 पुरस्कार? नॉमिनेशनची 'ही' तारीख लक्षात ठेवा  title=

Oscars 2025 nominations: दरवर्षी सिनेसृष्टीतील विशेष कामगिरी बजावणाऱ्या कलाकरांना 'ऑस्कर' हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी म्हणजेच 2025 सालातील 97 व्या अकादमी पुरस्काराचे नामांकन हे 17 जानेवारीला जाहीर केले जाणार होते. मात्र, कॅलिफोर्निया येथील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीच्या भीषण घटनेमुळे हा दिवस पुढे गेला. आता या पुरस्काराच्या नामांकनाची नवी तारीख समोर आली आहे. 

सर्वांनाच या पुरस्काराच्या घोषणेची उत्सुकता लागुन राहिली होती. तर, ऑस्कर 2025 या पुरस्काराचे नामांकन 23 जानेवारी रोजी जाहिर केले जाणार आहे. नुकतीच, यासंबंधीची माहिती अकादमीने सोशल मीडियावर दिली आहे. तसेच, यावर्षीच्या पुरस्काराचे नामांकन हे रॅचेल सेनॉट आणि बॉवेन या कलांकारांकडून घोषित केलं जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे. 

अकादमीने या पुरस्कारासंदर्भातील एक पोस्ट आपल्या एक्सवर शेअर केली आहे. 'या वर्षीच्या ऑस्कर नामांकनांचे होस्ट आहेत: बोवेन यांग आणि रॅचेल सेनॉट. गुरुवार, 23 जानेवारी रोजी सकाळी 8:30 AM ET / 5:30 AM PT वर 97 व्या ऑस्करसाठी कोणाला नामांकन मिळाले आहे, हे जाणून घ्या.' असे या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

यादिवशी होणार पुरस्काराच्या नॉमिनेशनची घोषणा

"यापूर्वी, ऑस्कर पुरस्काराची नामांकने 17 जानेवारी रोजी होणार होती, परंतु लॉस एंजेलिसमधील जंगलातील भीषण आगीमुळे ती रद्द करण्यात आली होती." असेही अकादमीने पोस्ट शेअर करत असताना लिहिले. या ऑस्कर पुरस्काराच्या नामांकनाचा कार्यक्रम हा Oscar.com, Oscars.org, ABC, Hulu, Disney+ आणि यासोबतच अकादमी च्या TikTok, YouTube, Instagram आणि Facebook चॅनलवर स्ट्रीम होणार असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं. या पोस्टद्वारे अकादमीचे सर्वेसर्वा बिल क्रेमर यांनी कॅलिफोर्नियातील आगीचा भीषण परिणाम झालेल्यांसाठी आपले दु:ख व्यक्त केले. 

 

लॉस एंजिल्समधील आगीमुळे रद्द करण्यात आली होती ऑस्कर नामांकने

पोस्टमध्ये अकादमीने असं सुद्धा लिहिलं होतं की, 'अनेक सदस्य आणि उद्योगाक्षेत्रातील सहकारी लॉस एंजिल्समध्ये राहतात, काम करतात आणि आम्ही त्यांचा विचार करत आहोत.' यानंतर एका रिपोर्टमध्ये कॅलिफोर्नियातील आगीमुळे ऑस्कर पुरस्कार रद्द होऊ शकतो असा दावा केला गेला होता. अशातच, सूत्रांनी सांगितलं, "यावेळी अकादमीची मुख्य चिंता अशी आहे की अनेक लोक वेदना आणि नुकसानाशी झुंजत असलेल्या या परिस्थितीत ते कार्यक्रम साजरा करताना दिसू नयेत."

 

ऑस्कर 2025 ची होणार घोषणा

अकादमीच्या सोशल मीडियावर नॉमिनेशनच्या घोषणा होणार असल्याच्या बातमीमुळे ऑस्कर पुरस्कार 2025 रद्द होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच, हे नामांकन 23 जानेवरीला होणार असून ऑस्कर पुरस्काराचा कार्यक्रम 2 मार्च 2025 ला होणार असल्याची तयारी सध्या सुरु आहे.