जेव्हा अभिषेकनं अमिताभ यांना लिहिली होती चिट्ठी! 'डार्लिंग पापा, तुम्ही काळजी करु नका आणि...'

Abhishek Bachchan- Amitabh Bachchan :  जेव्हा अभिषेकनं अमिताभ बच्चन यांना लिहिली होती चिट्ठी... ती शेअर करत बिग बींनी जाग्या केल्या आठवणी...

दिक्षा पाटील | Updated: Mar 16, 2024, 12:02 PM IST
जेव्हा अभिषेकनं अमिताभ यांना लिहिली होती चिट्ठी! 'डार्लिंग पापा, तुम्ही काळजी करु नका आणि...' title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan- Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन त्यांच्या आरोग्याला घेऊन चर्चेत आहेत. काल त्यांची अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आली. या सगळ्यात अमिताभ बच्चन यांची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात अभिषेक जेव्हा छोटा होता तेव्हा त्याच्या वडिलांच्या नावावर त्यानं चिट्ठी लिहिली होती. अमिताभ यांनी ही चिट्ठी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली होती. 

अमिताभ यांनी ही पोस्ट त्यांच्या जुन्या ट्विटर अकाऊंट म्हणजेच X अकाऊंटवरून 2019 मध्ये शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अभिषेकनं त्याच्या हातानं लिहिलेलं एक पत्र होतं. अभिषेकनं ही चिट्ठी तेव्हा लिहिली जेव्हा अमिताभ बराच काळ शूटिंगसाठी बाहेर असायचे. त्या पत्रात अभिषेकनं लिहिलं होतं की "डार्लिंग पापा, तुम्ही कसे आहात? मला तुमची खूप आठवण येते, तुम्ही लवकर परत याल, तुम्ही नेहमी आनंदी रहाल यासाठी मी प्रार्थना करत आहे. देव नक्कीच माझी प्रार्थना स्विकारेल, तुम्ही कोणतीही चिंता करु नका, आई आणि श्वेता ताईची मी काळजी घेतोय. आय लव्ह यू पापा, तुमचा डार्लिंग मुलगा अभिषेक." तर हेच पत्र शेअर करत अमिताभ यांनी लिहिली होतं की 'अभिषेक त्याच्या वैभवात.. मी जेव्हा शूटसाठी बाहेर असायचो तेव्हा त्यानं लिहिलेलं पत्र...' तर पुढे त्यांनी हिंदीमध्ये 'पूत सपूत तो क्यूँ धन संचय ; पूत कपूत तो क्यूँ  धन संचय' असं लिहिलं. 

अभिषेक नेहमी मुलाखतीत वडिलांसाठी मोकळेपणानं बोलताना पाहतो आणि त्यांच्यासाठी असलेलं त्याचं प्रेम जाहिरपणे सांगताना दिसतो. अभिषेकनं एकदा इतकंही सांगितलं होतं की "माझे वडील ज्यांनी सुपरस्टारडम मिळवलं आहे, त्यांचं हे सुपरस्टारडम मिळवण्याची माझी इच्छा नाही. कारण अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा कोणालाही असू शकत नाही आणि कोणालाही असू नये. त्याचं ही एक कारण आहे ते म्हणजे ते सगळ्यांनाच शक्य होईल असं नाही. त्यानं हे देखील सांगितलं की अमिताभ बच्चन यांच्यासारखी व्यक्ती शतकांमध्ये एकच असू शकते."

हेही वाचा : ऑप्रेशनची 'ती' बातमी खोटी! अमिताभ ठणठणीत; शुक्रवारी रात्री स्टेडियममध्ये मॅच पाहताना झाले स्पॉट

अमिताभ यांच्याविषयी सांगायचं झालं तर काल त्यांची अँजियोप्लास्टी सर्जरी करण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र, काल संध्याकाळी बिग बी ठाण्याच्या दादोजी कोंडादेव स्टेडियमवर इंडियन स्ट्रीट प्रीमियलर लीग (ISPL) च्या फायनल सामन्या दरम्यान दिसले. त्यावेळी मुंबई विरुद्ध टायगर्स ऑफ कोलकाता असा सामना होता. यावेळी अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन दोघेही उपस्थित होते. तेव्हा त्यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले होते.