मुंबई : अभिनेत्री स्मिता पाटील यांनी बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यामराठमोळया अभिनेत्रीने त्याकाळी आपल्या अभिनयाने आणि सैंदर्याने लोकांना भूरळ घातली होती. त्यांनी 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या नमक हलाल चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. परंतु या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्यांच्यासोबत असं काही घडलं, ज्यामुळे त्या शूटिंग अर्धवट टाकून आपल्या घरी गेल्या आणि त्यांनी ती संपूर्ण रात्र रडून काढली.
इतक्या मोठ्या चित्रपटाची शुटिंग मधेच थांबल्यामुळे ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. ज्यामुळे असं नक्की काय घडलं असावं. असा प्रश्न त्यावेळी लोकांच्या मनात उपस्थीत झाला होता.
अमिताभ बच्चनसोबत नमक हलाल चित्रपटातील एका फेमस गाण्यांनंतर हा सगळा प्रकार घडला. या घटनेबद्दल असं देखील म्हटलं जातं की, स्मिता पाटील यांनी ती संपूर्ण रात्र त्यांच्या आईच्या मांडीवर रडून घालवली.
स्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांचं 'आज राप्त जाने' हे गाणे प्रचंड हिट झाले होतं. परंतु हे गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील रडू लागल्या.
खरं तर 'आज रपत जाने' या लोकप्रिय गाण्यात अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांनी अनेक रोमँटिक सीन्स केले होते. पावसात भिजताना दोघांनीही अनेक रोमँटिक सीन केले होते, मात्र हे सीन करण्यात अभिनेत्री अजिबात खूश नव्हती
त्यावेळी या गाण्याचे शूटिंग संपल्यानंतर स्मिता पाटील घरी गेल्या आणि आपल्या आईच्या मांडीवर रात्रभर रडत होत्या.
या गाण्यात रोमँटिक सीन केल्यानंतर त्यांना खूप पश्चाताप झाला होता. आपण असा सिन का केला असं त्यांना मनातल्या मनात वाटू लागलं.
अमिताभ बच्चन यांना याची माहिती मिळताच ते स्मिता पाटील यांच्याकडे गेले आणि त्यांना समजावून सांगितले की तिने उगाच त्रास करुन घेऊ नये. कारण ही फक्त स्क्रिप्ट आहे आणि ती गाण्याची मागणी होती. तसेच आपल्या कामाचा तो एक भाग आहे. त्यामुळे त्याबद्दल वाईट विचार करु नये.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी समजवल्यानंतर स्मिता पाटील उर्वरीत शुटिंग करण्यासाठी तयार झाल्या आणि या प्रकरणानंतर त्यांच्यात आणि अमिताभ बच्चन यांच्यात खूप चांगली मैत्री झाली.
हा चित्रपट प्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शनाखाली बनला होता. जो चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीत खूप गाजला. तसेच दोघांच्या या गाण्याला लोकांनी भरभरून दाद दिली.