हद्दच झाली! मुनव्वर फारूकीला पाहण्यासाठी बिल्डिंगच्या एसीवर चढली महिला, Video तुफान व्हायरल

Woman Climbed To See Munawwar Faruqui : एका महिला फॅनने हद्दच पार केल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पहायला मिळतंय.

सौरभ तळेकर | Updated: Feb 4, 2024, 08:18 PM IST
हद्दच झाली! मुनव्वर फारूकीला पाहण्यासाठी बिल्डिंगच्या एसीवर चढली महिला, Video तुफान व्हायरल title=
Munawar Faruqui viral video

Munawar Faruqui Woman Fan Viral Video : छोट्या पडद्यावरिल बिग बॉस 17 (Big Boss 17) या रिअॅलिटी शोचा विजेता मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. सलमान खानने मुन्नवर फारूकीला विजयाची ट्रॉफी दिल्यानंतर मुन्नवर जेव्हा डोंगरीला पोहोचला, तेव्हा त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. रस्त्याच्या दुर्तफा झालेल्या गर्दीमुळे मुन्नवर फारुकी यांच्या चाहत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशातच आता एका महिला फॅनने (Munawar Faruqui Woman Fan) हद्दच पार केल्याचं पहायला मिळतंय. त्याचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पहायला मिळतंय.

मुनव्वरला पाहण्यासाठी रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी एका महिलेने मुनव्वरला पाहण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या. ही महिला घराबाहेर लावलेल्या एसीवर बसलेली दिसली. मुनव्वरच्या या फॅन महिलेने थेट घराची खिडकी उघडली अन् एसीवर जाऊन बसली. इमारतीवर चढून मुनव्वरला पाहण्याचा महिलेचा प्रयत्न पाहून लोकांना देखील आश्चर्याचा धक्का बसलाय. व्हिडिओतील महिलेचा वेडेपणा पाहून तिची सर्वत्र चर्चा होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, एका आभाळाला टेकणाऱ्या बिल्डिंगच्या खिडकीबाहेर महिला आरामात मांडी घालून एसीवर बसली आहे. तर समोर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मुन्नवरला पाहण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून इंस्टाग्रामवर 5 मिलियनहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 2 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाइक केलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Telly Drama (@tellydramatv)

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नवरचा चाहता युसूफ खान यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ड्रोनचा वापर केल्याने पोलिसांनी कारवाई केली होती. अशातच दुसरीकडे मध्य प्रदेशातील इंदूर येथे एका स्टँड-अप कॉमेडी कार्यक्रमात हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप मुन्नवरवर आहे. त्यामुळे येत्या काळात त्याच्या अडचणी वाढणार की काय? असा सवाल आता विचारला जातोय.

गुजरातमधील जुनागढ येथे जन्मलेल्या मुनावर फारुकीचे सुरुवातीचे आयुष्य अत्यंत गरिबीत गेले. इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो कुटुंबाच्या कामात मदत करू लागला. त्यांने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आजी आणि आईसोबत चकली आणि समोसे विकण्यासारखी अनेक कामे त्याने केली. एवढेच नव्हे तर मुनावरने भांड्याच्या दुकानात सेल्समन म्हणूनही काम केले. त्याने ग्राफिक डिझायनिंगचा कोर्सही केला आहे. मुनावरने 2017 मध्ये ओपन माइकमध्ये स्टँड-अप कॉमेडी करायला सुरुवात केली.