मुंबई : टेलिव्हिजनवरील हिट मालिकांबद्दल बोलायचे झाले तर 'ये रिश्ता क्या कहलाता है' नाव आपसुकच तोंडी येते. 2009 मध्ये सुरू झालेली ही मालिका आजही सुरूच आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. यामुळे 13 वर्षांनंतरही या मालिकेला तितकीच पसंती मिळताना दिसतेय. या मालिकेतील वर्षा आठवतेय. या वर्षाची व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना भरपूर आवडली होती.मात्र आता या वर्षाने अभिनय सोडला आहे, ती आता काय करतेय ते जाणून घेऊयात.
या मालिकेतील वर्षा म्हणजेच पूजा जोशी जिने अक्षरा म्हणजेच हिना खानची जवळची मैत्रीण आणि नंतर शोमध्ये तिच्या मेहुणीची भूमिका साकारली होती. वर्षाच्या भूमिकेत पूजा जोशीला खूप पसंती मिळाली होती. तिच्या निरागसतेने भरलेल्या आणि लाडक्या वहिनीच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले होते.
पूजा अनेक वर्षांपासून या मालिकेशी जोडली गेली होती. पण सध्या तिने या शोला खूप आधीच निरोप दिला आहे आणि त्यानंतर ती या शोमध्ये दिसली नाही. अशा परिस्थितीत घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री अचानक गायब कुठे झाली आणि आता ती काय करतेय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.
आता काय करते
पूजा जोशी हिचे लग्न झालेले आहे, तिला एक मुलगी देखील आहे. पूजाने बिझनेसमन मनीष अरोरासोबत लग्न केले आणि त्यानंतर ती पूजा जोशी अरोरा झाली आहे. लग्नानंतर तिची प्राथमिकता तिचं कुटुंब आहे. पण अभिनय सोडूनही ती घरी बसली नाही, मुंबईत ती स्वतःचे रोमिला नावाचे सलून चालवत आहे. पतीसोबत ती हा व्यवसाय सांभाळतेय. तसेच सध्या पूजाने अभिनयातून ब्रेक घेतला आहे.
दरम्यान सध्या पुजा जोशी अभिनयात हात आजमावत नसली तरी ती एक सक्सेसफुल बिझनेसमन बनण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत. तीची ही उपलब्धी पाहून चाहत्यांना आनंद होईल.