मुंबई : शरीर-मनाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीराला विविध पोषकतत्त्वांची आवश्यकता असते. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे कॅल्शियम. हाडे, दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज असते. कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात या पदार्थांचा समावेश करा.
शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी रोज ग्लास दूध प्या. शरीराला आवश्यक असलेली कॅल्शियम यातून मिळेल. त्याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस या आजाराची संभावना कमी होईल.
यातही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्याचबरोबर त्यात अन्य पोषकघटकही असतात. त्यामुळे प्रमाणात पण नियमित चीज खा.
पालेभाज्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीरातील कॅल्शियमची कमी भरून निघते. ब्रोकोली, पालक यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात अवश्य समावेश करा.
शरीरातील कॅल्शियमची कमी दूर करण्यासाठी रोज सुकामेवा खा. अक्रोड, बदाम, पिस्ता आणि काजू नियमित खाणे नक्कीच फायदेशीर ठरेल.