Acidity: छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल

Healthy Diet Plan : ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तोच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातले 3 ते 4 वेळेला नियमितपणे खात असतो तरी देखील अॅसिडीटीचा त्रास होत असतो. 

Updated: Jun 19, 2023, 05:08 PM IST
Acidity:  छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल  title=

Healthy Diet Plan News In Marathi : अन्नाचा एक घास खाल्ला की लगेचच छातीत जळजळ सुरू होते. या त्रासाला आजकाल अनेकजण त्रस्त झाले आहेत. बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याची चुकीची वेळ, सतत जंक फूड किंवा मसालेदार (मसाले) व तेलकट पदार्थांचा अभावामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो. छातीत सतत जळजळत असेल तर आपल्याला खाण्याचे मन करत नाही. अशावेळी संध्याकाळी अति खाणे टाळा. खूप लवकर खाल्ल्याने ऍसिड रिफ्लक्स होऊ शकते. अनेकदा चिंता व तणावामुळे ही जळजळ होऊ शकते. तसेच, कॅफीन, मद्यपान, धूम्रपान, मसालेदार अन्न, चॉकलेट, टोमॅटो आधारित उत्पागने यांचे जास्त सेवन करणे टाळा.  

ॲसिडीटीचा त्रास झाल्यावर छातीत जळजळणे, डोकेदुखी, मळमळ होऊन उलटीसारखे होणे अशा तक्रारी निर्माण होतात. काहीवेळा भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा 4 घास जास्त खाल्ले तरी ॲसिडीटी होते. झोप अपुरी झाली,  ऊन लागले, दगदग तरी ॲसिडीटी होऊ शकते. एकदा ॲसिडीटीसारखा आजार झालातर आपल्याला काही सुधारत नाही. अशी अॅसिडीटी  सतत होऊ नये म्हणून आहाराची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. आहारात पदार्थ आवर्जून वर्ज्य केले तर हा त्रास दूर होण्याची शक्यता आहे. ॲसिडीटीला कारणीभूत ठरणारे हे पदार्थ कोणते, पाहूया...

कोल्ड्रींक

उन्हाळ्यात दिवसांत आपण बाहेर आवर्जुन कोल्ड्रींक घेत असतो. यामध्ये जास्त प्रमाणात कार्बोनेट असते. तुम्हाला ॲसिडीटीचा त्रास असेल तर सोडा किंवा कोल्ड्रींक पिणे घातक ठरू शकते. याशिवाय तुम्ही कोकम सरबत, उसाचा रस, नारळ पाणी अशी नैसर्गिक पेय घ्यायला हवीत. 

कॉफी

काम करताना फ्रेश वाटावे म्हणून अनेकांना कॉफी पिण्याची सवय असते. पण तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त कॉफी पित असाल तर ती आरोग्यासाठी योग्य ठरू शकते. कॉफीमध्ये पॉइंट कॅफीन पोटात ॲसिडीटीची निवड करतं. तसंच रीकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणेही ॲसिडीटीसाठी घातक असते.

आंबट फळे

फळं आरोग्यासाठी खूप उपयुक्त असतात, विविध रंगाची, चवची फळं आहारात असायला हवीत असं सांगितले जाते. मात्र तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास असेल तर आंबट फळं खाणे टाळायला  हवं. यामध्ये अननस, संत्री, मोसंबी, द्राक्षां या सारख्या फळांचा समावेश होतो.

अशी घ्या काळजी...

- नियमित 7 ते 8 तास झोप घेणे महत्त्वाचे असते. 

- धूम्रपान किंवा मद्यपान ॲसिडीटीसाठी घातक असते.

- बैठ्या काम खाल्लेले अन्न नीट पचत नाही, त्यामुळे दर काही वेळाने कामातून ब्रेक घ्या... 

 

 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)