मुंबई : आजचं धकाधकीचं जीवन, बदलती जीवनशैली त्यामुळे ह्रदय रोगाचे प्रमाण डोकवर काढत आहे. अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव आणि आयुष्यातला तणाव यामुळे शरीरात कोलेस्ट्रोलचे प्रमाण वाढते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. शरीरात कोलेस्टोलचे प्रमाण अधिक असलेल्या व्यक्तींना बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टी करण्याची शक्यता असते. त्यामुळे कोलेस्टोलचे प्रमाण नियमित राखण्यास काही घरगुती उपाय तुमची मदत करू शकतील. परंतू जर त्रास जास्त होत असल्यास तात्काळ डॉक्यरांचा सल्ला घ्यावा.
एक कप लिंबाचा रस, आल्याचा रस, कांद्याचा रस, सफरचंद व्हिनेगर व्यवस्थित एकजीव करून घ्या. त्यानंतर एका भांड्यात मंद आचेवर ठेवा. किमान एक तास शिजवल्यानंतर गार होवू द्या. गार झल्यानंतर त्या मिश्रणामध्ये तीन कप मध घाला.
त्यानंतर एका बाटलीमध्ये तयार मिश्रण काढून ठेवा. रोज सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन करा. नियमित याचे सेवन केल्याने आपलं हृदय स्वस्थ राहील आणि ऑपरेशन टाळता येईल.