नाचो! वजन कमी ते तणाव दूर करण्यापर्यंत झुम्बा डान्सचे फायदे

व्यायाम जर कामासारखे केले तर कंटाळ येतो. व्यायाम करताना कोणता तणाव नसला पाहिजे. जर व्यायाम कमी आणि मस्ती

Updated: Dec 19, 2019, 07:17 PM IST
 नाचो! वजन कमी ते तणाव दूर करण्यापर्यंत झुम्बा डान्सचे फायदे  title=

मुंबई : व्यायाम जर कामासारखे केले तर कंटाळ येतो. व्यायाम करताना कोणता तणाव नसला पाहिजे. जर व्यायाम कमी आणि मस्ती जास्त असेल तर? ते काम फक्त हे झुम्बा डान्ससोबत होवू शकतं. व्यायामाचा तुम्ही जेवढा आनंद घ्याल, तुम्ही त्याला तेवढ्या चांगल्या पद्धतीत करू शकाल. 

झुम्बा डान्स तुमच्यासाठी एक मजेदार वर्कआउट आहे, ज्यात तुम्ही मस्ती करत-करत वजन कमी करू शकतात.

झुम्बा डान्सच्या एका तासात ६०० ते १ हजार कॅलरीज बर्न करू शकतो. झुम्बा डान्स तुमच्या हृदयासाठी चांगला आहे. रोजच्या तणावाला विसरून तुम्ही डान्सवर लक्ष केंद्रीत करून तणाव दूर करू शकतात.

झुम्बा डान्समध्ये तुमचे हाथ आणि पाय वेगवेगळ्या दिशेत असतात, यात समन्वय असणे गरजेचे आहे. झुम्बा डान्स सतत केल्याने तुमचा समन्वय चांगला होतो आणि तुम्हाला तुमच्या शरिराला हालचाल सहज करण्यास मदत होते.

झुम्बा डान्स हा मधुमेहासाठी तर उपयोगी आहेच, पण वजन कमी करण्यास देखील मदत करतो.