स्तनपान देणाऱ्या महिलांनी 'ही' फळं जरूर खावीत

स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहारात आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. 

Updated: Apr 17, 2022, 02:28 PM IST
स्तनपान देणाऱ्या महिलांनी 'ही' फळं जरूर खावीत title=

मुंबई : लहान मुलांसाठी आईचे दूध हा सर्वात पौष्टिक आहार मानला जातो. आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, बाळाच्या जन्मापासून 6 महिने त्याला फक्त आईचं दूध द्यावं. आईचं दूध ऊर्जा आणि पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे. नुकत्याच माता झालेल्या महिलांसाठी स्तनपान फायदेशीर मानले जाते.

डाएट एक्सपर्ट डॉक्टर रंजना सिंह सांगतात की, स्तनपान देणाऱ्या महिलांनी त्यांच्या आहारात आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यामुळे बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. 

अनेकदा स्तनपान देणाऱ्या महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की, कोणत्या फळांचं सेवन करावं. तर आज जाणून घेऊया स्तनपान देणाऱ्या महिला कोणत्या फळांचं सेवन करू शकतात.

हिरवी पपई

स्तनपान देणाऱ्या महिलांनी हिरव्या रंगाची पपई खाण्यावर भर दिला पाहिजे. पपईमध्ये गॅलेक्टागॉग असतं, जे स्तनामध्ये दूध उत्पादनासाठी उपयुक्त मानलं जातं. पपई खाल्ल्याने डिहायड्रेशनची समस्या दूर होते, हे स्तनपानासाठी उपयुक्त असतं.

चीकू

स्तनपान देणाऱ्या महिलांनी चिकूचं सेवन करावं. चीकूमध्ये कॅलरी असते जी स्तनपान देणाऱ्या महिलेसाठी फायदेशीर ठरू शकते. चीकू खाल्ल्याने स्तनपानादरम्यान बर्न होणारी कॅलरी तुम्ही पुन्हा गेन करू शकता. 

अंजीर

अंजीर हे एक असं फळं आहे जे तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवते. यामध्ये मॅग्नेशियम, कॉपर, कॅल्शियम आणि आयर्न असे पोषक घटक असतात. याशिवाय अंजीरचं सेवन आई आणि मूल या दोघांसाठीही फायदेशीर असतं.