केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवाल

Cake Causes Cancer : सरकारचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय. 

नेहा चौधरी | Updated: Oct 6, 2024, 01:03 PM IST
केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवाल  title=
Cake Causes Cancer Government reports that 12 cakes with Red Velvet black forest are dangerous

Cake colour is harmful for body : दिल चाहता है या चित्रपटातील एक संवाद आहे, ज्यात अमीर खान म्हणतो केक खाण्यासाठी ते कुठेही जाऊ शकतात. केक हा आपल्या आयुष्यातील एक भाग झाला आहे. वाढदिवसपासून छोट्या मोठ्या आनंदात केक कापणे ही एक प्रथा झाली आहे. अगदी छोट्या छोट्या आनंदात केक आणून सेलिब्रेशन केलं जातं. असं शौकीन पण आहे काही कारण नसताना केक खायला त्यांना आवडतात. पण थांबा हा केक तुमच्यासाठी आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतो. एका अहवालानुसार तुमचा आवडीचा चॉकलेट केक... पाईन अ‍ॅप्पल केक...ब्लू बेरी... रेड वेल्वेट केक.. ब्लॅक फॉरेस्ट केक यामुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय. (Cake Causes Cancer Government reports that 12 cakes with Red Velvet black forest are dangerous) 

कॅन्सरच्या केकपासून सावध राहा!

हा धक्कादायक अहवाल कर्नाटकच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाने दिलाय. बेकरीमध्ये तयार होणाऱ्या अनेक केकमध्ये कर्करोगाच्या घटकांचा समावेश असल्याचा अहवाल दिलाय. कर्नाटक सरकारचे म्हणणंय की, एकूण 235 केक नमुन्यांपैकी 223 सुरक्षित असल्याचा दिसून आलं. मात्र 12 केकमध्ये धोकादायक पातळीवर कृत्रिम रंग असल्याचे आढळले आहे. बंगळुरूमधील अनेक बेकरींच्या केकवर केलेल्या सर्व चाचण्यांमध्ये, 12 वेगवेगळ्याप्रकारच्या केकमध्ये, विशेषत: रेड वेल्वेट केक आणि ब्लॅक फॉरेस्ट केकमध्ये कर्करोग निर्माण करणारे पदार्थ आढळून आले आहेत. 

कोणते आहेत ते घटक?

तज्ज्ञांच्या मते, केकमध्ये अनेक प्रकारचे रंग वापरले जातात, जसे की अल्लुरा रेड, सनसेट यलो एफसीएफ, पॉन्सो 4आर (स्ट्रॉबेरी रेड), टारट्राझिन (लेमन यलो) आणि कार्मोइसिन (मारून) सुरक्षित पातळीपेक्षा जास्त वापरल्यास, ते केवळ कर्करोगाचा धोका वाढवत नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील त्याचा मोठ्या परिणाम होतो. 

तज्ज्ञांच्या मते केकमध्ये प्रिझर्वेटिव्ह आणि घातक रसायने असतात. यामध्ये रंगांचा भरपूर वापर केला आहे. याशिवाय त्यात प्रिझर्व्हेटिव्ह आणि घातक रसायने वापरली जातात जी संपूर्ण शरीरासाठी अत्यंत घातक ठरतात. त्याचे दुष्परिणाम माहीत असूनही बेकरी विकत आहेत.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)