मुंबई : मोबाईलमुळे आता पोटाचे विकार वाढू लागले आहेत अशी धक्कादायक माहिती समोर आलीय ! आश्यर्य वाटतंय ना .. परंतु हे नकळत आपल्या आयुष्यात घडत आहे ... मोबाईलच्या अधिक वापराचे अनेक तोटे आपण पाहिलेत परंतु आता त्यामुळे पोटाचे आजरा वाढत आहे असे डॉक्टर धक्कादायक खुलासा करत आहेत. सर्वांची दिवसाची सुरवातच आता मोबाईलमुळे होत आहे. मोबाईल काही काळ आपल्या जवळ नसेल तर लोक बैचैन होतात.असेच चित्र सर्वत्र आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे अनेक तोटे समोर आलेत आणि आता तर मोबाईलमुळे पोटाच्या आजरा वाढू लागलेत. हे ऐकून आश्चर्यचा धक्का वाटत ना !हो पण हे घडतेय. नकळत घडतेय आपल्या आयुष्यात...अगदी सर्वांच्याच ... सकाळी उटल्यावर पहिल्यांदा आपण मोबाईल घेतो आणि टॉयलेटला जातो.
टॉयलेट मध्ये आपण मोबाईल वर कार्यरत होतो. त्यामुळे आपण टॉयलेट वर लक्ष केंद्रित करत नाही आणि त्यामुळे टॉयलेट प्रक्रिया अर्धवट राहते आणि मग पुन्हा पुन्हा आपण दिवसभरात टॉयलेटला जावे लागते आणि या अर्थवट राहिलेल्या टॉयलेट च्या प्रेक्रियेमुळे अनेक पोटाचे आजार उदभवतात. त्यात गॅस होणे ,मूळव्याध ,अल्सर असे पोटाचे अनेक आजार... निर्माण होतात ... आणि पुढे जाऊन हेच आजार कॅन्सर पर्यंत जातात. तसेच या मोबाईलमुळे अनेक मानसिक आजार ही जडले जात आहेत. काहींना मोबाईल टॉयलेट मध्ये घेऊन जात नाही तो पर्यंत टॉयलेट होत नाही अशी मानसिकता अनेकनाची आहे हा एका प्रकारचा मानसिक आजरा आहे आणि यावर उपाय म्हणजे टॉयलेट ला जाताना मोबाईल वापरू नये असा सल्ला यावर पोट विकार तज्ञ डॉ.संजय कुमावत यांनी दिला आहे.
मोबाईलचे अनेक दुरुपयोग आपण पाहिलेत त्याचे दुष्परिणाम ही पाहिलेत. परंतु आता मोबाईलमुळे असे विकार जर जडत असतील तर मोबाईलचा उपयोग योग्य तेवढाच आणि योग्य वेळी करणेच गरजेचे आहे !