कच्च्या तांदळाचं सेवनाने या गंभीर समस्यांना मिळतंय आमंत्रण

काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते.

Updated: Jun 15, 2021, 03:09 PM IST
कच्च्या तांदळाचं सेवनाने या गंभीर समस्यांना मिळतंय आमंत्रण title=

मुंबई : चपातीप्रमाणे भाताचं सेवनही भारतात खूप प्रसिद्ध आहे. बहुतेक किनारपट्टी आणि डोंगराळ भागात तांदळाचा वापर केला जातो. चपातीच्या तुलनेत बहुतेक लोकं भात खाणं पसंत करतात. मुख्य म्हणजे तांदूळ केवळ फक्त सहज पचत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. 

भातमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वं तसंच खनिजं आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम, फायबर, लोह, थायमिन आणि राइबोफ्लेविनचे ​​महत्त्वपूर्ण प्रमाण असतं. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. पण शिजवलेला तांदूळ फायदेशीर ठरतो. मात्र, काही लोकांना कच्चा तांदूळ खाण्याचीही सवय असते. कदाचित तुम्हाला देखील ही सवय असू शकते. पण तुम्हाला माहितीये का तुमची ही सवय घातक ठरू शकते. 

तर आज जाणून घेऊया कच्चा तांदूळ खाल्ल्याने काय नुकसान होतं?

पाचक प्रणालीवर परिणाम 

कच्च्या भातमध्ये लेक्टीन हे प्रोटीन आढळतं. हे कीटकनाशक म्हणून कार्य करतं. त्यामुळे कच्च्या तांदळाचं सेवन टाळलं पाहिजे. यामुळे पचन समस्या उद्भवू शकतात.

किडनी स्टोन

ज्या व्यक्ती कच्च्या तांदळाचं सेवन करतात त्यांना किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना किडनी स्टोनचा त्रास असतो त्यांनीही कच्चा तांदूळ खाऊ नये.

फूड पॉयझनिंग होऊ शकते

कच्च्या तांदळाचं नियमित सेवन केल्याने फूड पॉयझनिंग देखील होऊ शकतं. यामध्ये बॅसिलस सिरस नावाचा बॅक्टेरिया असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्ही कच्चा तांदूळ खाणं टाळावं.

शरीरातील उर्जा कमी होते

जे लोक कच्च्या तांदळाचं सेवन करतात त्यांच्या शरीरात स्फुर्ती नसते. अशा व्यक्तींना लगेच आळस येऊ लागतो. कच्च्या तांदळाचे सेवन केल्याने थकवा येतो, ज्यामुळे शरीरातील उर्जा कमी होते.