मुंबई : गेल्या 2 वर्षांपासून जवळपास आपण कोरोनाच्या महामारीचा सामना करतोय. तेव्हापासून प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे की, कोरोनाचा अंत कधी होणार? ही महामारी कधी संपणार? दरम्यान यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठं विधान केलं आहे. 2022 मध्ये कोरोनाच्या या महामारीचा अंत होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
सध्या ही भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. मात्र WHOला अशी आशा आहे की, जर अजून काही नाही झालं तर ही महामारी 2022मध्ये संपण्याची शक्यता आहे. महामारीचा अंत होणार म्हणजे कोणता मोठा प्रकोप होणार नाही.
WHOने म्हटलंय की, रूग्णांच्या संख्येत वाढ झाली म्हणजे याचा अर्थ व्हायरस म्यूटेशनसाठी सक्षम आहे. त्यामुळे आम्हाला नेमकं माहिती नाही की, कशी परिस्थिती निर्माण होणार आहे.
वुजनोविकच्या नुसार, डब्ल्यूएचओ भविष्यवाणी करण्याचा प्रयत्न करतंय की, ही महामारी कधी संपेल? मात्र आता हे सांगणं खूप कठीण आहे कारण, प्रत्येक देश त्यांची रणनिती बदलतोय. ओमायक्रॉन व्हेरिएंट खूप संसर्गजन्य होता आणि वेगाने पसरत होता. यावेळी काही देशांमध्ये लक्षणविरहीत रूग्णांची संख्या वाढत होती मात्र सर्वांची टेस्ट करण्यासाठी त्यांच्याकडे पैसै नव्हते.
काही देशांमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होताना दिसतेय. रूग्णसंख्या कमी होताच या ठिकाणी निर्बंधंही शिथिल करण्यात आले आहेत. स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वेमध्ये सगळे कोरोनाचे निर्बंध हटवण्यात आलेत.