Bitter Gourd Juice Side Effects: कडू कारले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहासह अनेक आजारांवर कारलं हा रामबाण उपाय आहे. कारलं खाल्ल्याने पाचनसंबंधी समस्या आणि डोळ्यांसंबधीत समस्या दूर होतात. फक्त इतकंच नव्हे तर, रोगप्रतिकार शक्तीदेखील मजबूत होते. कारल्याचा ज्यूस खूप जास्त फायदेशीर असतो. मात्र, कारल्याचा ज्यूस अतिप्रमाणात प्यायल्यामुळंही शरीराला नुकसान होऊ शकते. काय आहेत अतिप्रमाणात कारल्याचा ज्यूस पिण्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया.
कारल्याला मोमोर्डिका चारेंटिया असंदेखील म्हटलं जात. आशिया, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन आणि पूर्व अफ्रिकेसह अन्य क्षेत्रात या भाजीचे पीक घेतले जाते. आरोग्याच्या दृष्टीने अनेकांना कारलं खाण्याचा सल्ला दिला जातो. कारल्यात अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्याचबरोबर यात रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. अनेक संशोधनातून समोर आलं आहे की मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारलं खाण खूप फायदेशीर असते.
जर एखाद्या व्यक्तीचा मधुमेह नियंत्रणात असेल किंवा डायबिटीजची लेव्हल कमी असेल तर त्यांनी कारल्याचा ज्यूस पिऊ नये. कारण त्यामुळं डायबेटिजची लेव्हल कमी होऊ शकते. म्हणजेच हायपोग्लायसीमियाची स्थिती निर्माण होते आणि हे आरोग्यासाठी धोक्याचे आहे. जेव्हा मधुमेहाच्या रुग्णांची शुगर लेव्हल कमी व्हायला लागते तेव्हा त्यांना गोड खाण्याचा सल्ला दिला जातो. कारले शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी करते. कारण कारल्यात असे गुणधर्म असतात जे शरीरातील इन्सुलीनची लेव्हल कमी करते. कारले प्रीडायबेटिक किंवा मधुमेहावर उपचार नाहीये. कारलं फक्त रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते.
गरोदरपणात कारल्याचे सेवन करु नये. जास्त प्रमाणात कारले खाल्ल्याने गर्भावर परिणाम होऊ शकतो. तसंच, कारल्याचे रोज सेवन करणे यकृतासाठी हानिकारक ठरु शकते. कारल्यात लेक्टिन आढळते. कारल्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास जुलाब व उलट्या होऊ शकतात. त्यामुळं कोणतंही गोष्ट ही प्रमाणातच खावी. अतिप्रमाणात कारले खाल्ल्याने त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)