मुंबई : अनेकदा तळकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्याने त्रास होतो. पचनसंस्थेवर परिणाम झाल्याने पोटात गॅस होणं, छातीत जळजळणे, हार्टबर्नचा त्रास होतो. अशावेळेस उठता बसतानाही त्रास होतो. त्यामुळे सुरूवातीला लहान वाटणार्या पण कालांतराने गंभीर ठरणार्या या समस्यांकडे वेळीच लक्ष देणं गरजेचे आहे.
पचनाचा हा त्रास तीव्र स्वरूपाचे होत नाही तोपर्यंत अनेकजण त्याकडे लक्षही देत नाहीत. शरीरात पित्त वाढल्यानंतर छातीत जळजळ, वेदना, आंबट ढेकर, गळ्याजवळ, तोंडात सूज, उचकी, अचानक वजन कमी होणं, उलट्यांचा त्रास होणं हे सारेच वाढते.
पित्ताच्या त्रासामुळे वाढणारा हा त्रास तुम्ही सुरूवातीच्या टप्प्यावर ओळखू शकल्यास त्यावर औषधोपचारांपेक्षा आहारातील काही बदलांद्वारा उपाय करता येऊ शकतात.
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी पपई फायदेशीर आहे. त्यामधील पॅपेन घटक पचन सुधारायला मदत करतात. तर फायबर घटक पोटातील घातक घटक बाहेर टाकतात. पित्ताचा त्रास असणार्यांनी नाश्त्याला आहारात पपई नियमित खाणंही फायदेशीर आहे.
पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी कोरफडीचा रस फायदेशीर आहे. यामुळे पोटाच्या नाजूक लाईनिंगचं रक्षण होते. पुदीना पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतात.
संत्र, मोसंबी, लिंबू यासारखी आंबट फळ अल्कलाईन घटकांमुळे पोटातील अॅसिड कमी होते.
नारळपाण्यातील फायबर घटक शरीराला डिटॉक्सिफाय करायला मदत करतात. यामुळे पोटातील गॅसचा त्रास, हार्टबर्नचा त्रास कमी होतो.
दह्यातील चांगले बॅक्टेरिया पोटाला थंडावा देण्यास मदत करतात. पित्ताचा त्रास कमी करण्यास सोबतच हार्टबर्न कमी करण्यास वाटीबह्र दही खाणं फायदेशीर आहे.
पोटाच्या आरोग्यासाठी केळ फायदेशीर आहे. यामुळे आतड्यांचा दाह कमी होतो. केळ्यातील फायबर घटक आतड्यांना होणारा त्रास कमी करण्यास मदत करते.
आलं पाचक असल्याने पोटातील गॅसचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.