मुंबई : आपलं शरीर अनेक गोष्टींमध्ये आधीच काही संकेत देत असतं. पण आपल्याला ते ओळखता येत नाही. त्यामुळे त्यांची योग्य माहिती आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. असे अनेक रोग आहेत जे आपल्याला जाणवत नाहीत, परंतु जेव्हा ते आपल्याला कळतात तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. नखांवर पांढरे डाग हे देखील एका आजाराची लक्षणं आहेत. या छोट्या लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो जे नंतर आपल्यासाठी घातक ठरतात.
1. नखांवर पांढरे डाग पडणे याला वैद्यकीय भाषेत ल्युकोनीचिया असे म्हणतात. पण हे पांढरे डाग कोणत्याही रसायनाची (नेल पॉलिश किंवा जेल आधारित नेल पेंट) ऍलर्जी देखील दर्शवतात. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. नखांवर पांढरे डाग काही वेळा अनुवांशिक कारणांमुळे देखील असतात. अॅनिमियाबाबत देखील ते संकेत देत असतात. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे नखांवर पांढरे डाग तयार होतात. अनेक वेळा बुरशीजन्य संसर्गामुळे नखांवर पांढरे डागही तयार होतात. या संक्रमणांमुळे तुमच्या बोटांना मोठा धोका असू शकतो.
3. योग्य खाण्यापिण्याच्या अभावामुळे देखील असे होते. शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्यास नखांवर पांढरे डाग दिसतात. हे टाळण्यासाठी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.