Fat Loss Mistakes To Avoid In marathi: वाढलेलं वजन कमी ( Weight loss ) करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. वजन कमी ( Weight loss ) करण्यासाठी व्यक्तीला जीवनशैली, आहार या सर्वकाही गोष्टी बदलाव्या लागतात अगदी नियमित व्यायाम करावा लागतो. बर्याच वेळा फॅट किंवा कॅलरीज बर्न ( Calories Burn ) करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होतं. कदाचित तुमच्याकडूनही नकळत या चुका होत असतील. जाणून घेऊया अशा कोणत्या चुका आहेत, ज्या आपण टाळल्या पाहिजेत.
अनेकजण वजन कमी करण्याचा प्रयत्नात तणावग्रस्त होतात. ज्यांना वजन कमी करायचंय ते दररोज वजन कमी झालंय का हे पाहण्यासाठी वजन करतात. यामुळे तणावाची पातळी वाढतच जाते. तणावाची पातळी वाढल्याने लठ्ठपणा कमी होण्याऐवजी वाढू शकतो. त्यामुळे अशावेळी तुमच्या या गोष्टीपासून दूर राहिलेलं योग्य आहे.
वजन कमी करण्यासाठी लोकं डाएट करतात. फॅट बर्न करण्यासाठी आपल्या निरोगी आहारात कपात करणं योग्य नाही. यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. त्याचप्रमाणे खूप वेळ उपाशी राहिल्यानेही जास्त खाणं सुरू होतं. त्यामुळे वजन कमी करायचं असल्यास जेवण कधीही टाळू नये.
वजन कमी करण्याच्या आहाराचं पालन करताना लोकांना कार्ब्सचं सेवन करण्यास मनाई असते. मात्र तुम्हाला माहितीये का ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला कार्ब्स मिळतात त्यामध्ये फायबर देखील चांगलं असतं. कर्बोदकांमधे कमी करण्यासाठी, लोक त्यांच्या फायबरचे सेवन कमी करतात. यामुळेही तुमच्या वजनात वाढ होऊ लागते.
असं मानलं जातंय की, जे लोक वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जातात त्यांना प्रोटीन आहाराची आवश्यकता असते. तर वजन कमी करण्यासाठी काहीजण प्रोटीननयुक्त आहार घेतात. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त प्रोटीन घेतल्यास शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवर त्याचे खूप वाईट परिणाम होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)