मुंबई : कोलेस्टेरॉल हा मेणासारखा पदार्थ आहे जो चरबीप्रमाणेच असतो. आपल्या शरीराला काही प्रमाणात कोलेस्टेरॉलची गरज असते जी सेल झिल्ली, व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आवश्यक असते. शरीराला जितके कोलेस्टेरॉल आवश्यक असते, ते यकृत नैसर्गिकरित्या तयार करतं. मात्र, शरीरातील अनेक समस्यांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते.
उच्च कोलेस्टेरॉलची पातळी आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्याच्या वाढीमुळे हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. CDC नुसार, उच्च रक्त कोलेस्ट्रॉल 200 मिलीग्राम प्रति डेसीलिटर (mg/dL) किंवा त्याहून अधिक धोकादायक मानलं जातं.
शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्याची अनेक कारणं असू शकतात. चला जाणून घेऊया कोणती कारणं आहेत ज्यामुळे अचानक कोलेस्ट्रॉल वाढू लागते.
अमेरिकन हार्ट असोसिएशन (एएचए) च्या मते, कोलेस्ट्रॉलच्या सामान्य कारणांमध्ये असंतुलित आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा यांचा समावेश असतो. या सर्व गोष्टींमुळे दीर्घकाळ कोलेस्टेरॉल वाढतं.
कोलेस्टेरॉलची पातळी अचानक वाढण्याची कारणं कोणती?
कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण खूप जास्त असते, त्यामुळे रक्तदाब वाढतो. याशिवाय कॉफीचं सेवन केल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉलही वेगाने वाढते. 2018 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज 4 एस्प्रेसोचे सेवन केल्याने शरीरात LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी अचानक वाढते.
तणाव आणि कोलेस्टेरॉल पातळी यांच्यात मजबूत संबंध आहे. मानसिक तणावामुळे शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी अचानक खूप वाढू लागते. हे कॉर्टिसॉल हार्मोनमुळे असू शकतं, जे तणाव दरम्यान वाढतं. 2020 च्या एका लेखानुसार, कोर्टिसोल हार्मोनच्या उच्च पातळीमुळे, शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढते.
काही औषधांच्या सेवनामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. या औषधांमध्ये रक्तदाब कमी करणारी औषधं, बीटा ब्लॉकर्स, डॅनॅझोल, रेटिनॉइड्स, अँटीव्हायरल औषधं, अँटी सायकोटिक्स इत्यादींचा समावेश आहे.