Low Sperm Count Reasons in Marathi: लैंगिक संबध प्रजनन वाढीसाठी खूपच महत्वाचे असतात. यामुळेच पुरूषांचे शुक्राणू अर्थात स्पर्म यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. बदलत्या जीवन शैलीचा परिणाम पुरुषांच्या स्पर्म काउंटवर होत आहे. सध्या पुरुषांच्या स्पर्म काउंटमध्ये घसरण होत आहे. यामुळे पुरूषांना नपुंसकत्व येत आहे. यामागे विविध कारणे आहेत. यापैकी महत्वाचे कारण आहे ते अंडरगारमेंट्स. याच अंडरगारमेंट्समुळे पुरुषत्त्व धोक्यात येत असल्याचा धक्कादायक निरीक्षण संशोधनातून समोर आले आहे.
स्पर्म काउंट घसरण्यामागे विविध कारणे आहेत. यामुळे काही चुका टाळल्यास आणि त्यानुसार बदल केल्यास या समस्येपासून सुटका होऊ शकते. जाणून घेऊया स्पर्म काउंट घसरण्यामागची कारणे.
अमेरिकेमध्ये मेल इनफर्टिलिटी रिसर्च करण्यात आलाय. त्यात घट्ट कपडे घातल्यानं फर्टिलिटीवर परिणाम होत असल्याचं समोर आलंय. वंध्यत्वाची समस्या असलेल्या पुरूषांचा सर्वेक्षणात समावेश होता. त्यांची दिनचर्या, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, सिगारेट, दारूचं व्यसन याचा अभ्यासात समावेश होता. यात घट्ट कपड्यांऐवजी सैल कपडे घालणा-या पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट 17 टक्के जास्त आढळून आला. याचाच अर्थ टाईट कपडे घालणाऱ्या पुरुषांना स्पर्म काउंट कमी होण्याचा धोका सर्वाधिक आहे.
पुरुषांचा स्पर्म काउंट कमी होण्यामागे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे अंडरगारमेंट्स. बरेच पुरुष हे घटट् आणि एका विशिष्ट प्रकारचे अंडरगारमेंट्स परिधान करतात. याचा परिणाम फॉलिकल उत्तेजक हार्मोनवर होते. हे हार्मोन स्पर्म काउंट वाढीसाठी अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे अंडरगारमेंट्स निवडताना जास्त घट्ट नसाव्यात याची खबरदारी पुरुषांनी घेतली पाहिजे.
लठ्ठपण यामुळे देखील स्पर्म काउंट कमी होऊ शकतो. अशा पुरुषांना नपुंसकत्वाचा धोका अधिक असतो. यामुळे वजन कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे स्पर्म काउंट वाढून प्रजनन क्षमता वाढण्यास मदत होईल.
धुम्रपान, मद्यपान आणि अंमली पदार्थांचे सेवन एकूणच आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. मात्र, याचा पुरुषांच्या स्पर्म काउंटवर देखील अत्यंत विपरीत परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते. शुक्राणू निष्क्रिय होण्याचा धोका असतो. दारुच्या सेवनामुळे शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो परिणामी नपुंसकत्वाचा धोका निर्माण होऊ शकतो. ड्रग्ज अर्थात अंमली पदार्थांचेसेवन केल्याने थेट पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.