Eggs Side Effects : उन्हाळ्यात आपला आहार योग्य असला पाहिजे. उष्णतेची दिवस आहेत. अंड्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जात असले तरी उन्हाळ्यात याचे सेवन केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. 'संडे असो की मंडे, रोज खा अंडे' अशी जाहिरातही केली जाते. किंवा सांगितले जाते. अंडे खाणे आरोग्यासाठी चांगले असते. अंड्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण त्यात प्रोटीन आणि कॅल्शियमसारखे घटक आढळतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. अंडी रोज सेवन केली तर तुम्हाला अनेक फायदे होतात. हे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि स्नायू बळकट आणि चांगले होतात. पण उन्हाळ्यात अंड्याचे सेवन केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
पोटातीलउष्णता वाढते -
अंडे आपल्या आरोग्यासाठी ऊर्जा देणारे असले तरी उन्हाळ्यात अंड्याचे सेवन केल्यास पोटात उष्णता वाढते. कारण अंड्याचा प्रभाव गरम असतो. त्यामुळे उष्णता आणखी वाढते. अशा स्थितीत तुमचे पोट खराब होऊ शकते. त्याचवेळी, तुम्हाला अॅसिडिटी आणि जळजळ यांसारख्या समस्या सुरु होतात. म्हणूनच उन्हाळ्यात अंडी खाणे शक्यतो टाळावे.
पचनक्रीया बिघडू शकते -
'संडे असो की मंडे, रोज खा अंडे' असे जरी सांगितले गेले तरी उन्हाळ्यात अंड्याचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला पोटदुखी आणि अपचनाचा त्रास होऊ लागतो. त्यामुळे उन्हाळ्यात अंडी खाल्ल्यास भरपूर पाणी प्यायले पाहिजे.
किडनीवर वाईट परिणाम होतो -
अंडे गरम असल्याने उन्हाळ्यात अंड्याचे सेवन केल्याने किडनीवर वाईट परिणाम होतो. कारण अंड्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे याचे सेवन केल्याने किडनी खराब होते. अशाप्रकारे, जर तुम्हाला आधीच किडनीशी संबंधित समस्या असेल तर तुम्ही अंडी खाणे टाळावे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)