मुंबई: बऱ्याच वेळा आपण बाजारातून आणलेली कोथिंबीर ताजी राहात नाही. खूप लवकर खराब होते. ती चांगली राहावी यासाठी आपण पेपरमध्ये गुंडाळून ठेवतो किंवा अजून काही ट्रिक्स वापरतो. मात्र कोथिंबीर नेमकी कशामुळे एक दिवसात खराब होते याचं कारण जाणून घेतलं का. कदाचित हे कारण जाणून घेतल्यानंतर आपण त्या चुका करणार नाही. न जाणे त्यामुळे आपली कोथिंबीर टवटवीत राहील.
बाजारातून आणलेली ताजी हिरवी कोथिंबीर काही काळ घरात ठेवल्यानंतर खराब होऊ लागते. असं बऱ्याचदा घडतं. कोथिंबीर एकतर सुकते किंवा सडते अशा समस्यांचा सामना रोज करावा लागत असतो. हे घडते कारण आपण ते योग्य प्रकारे साठवत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा 5 चुका सांगणार आहोत ज्यामुळे कोथिंबीर खराब होते.
कोथिंबीर स्टोर करण्याची पद्धत
अनेक लोकांना कोथिंबीर स्टोर करून ठेवण्याची सवय असते. मात्र ते विसरतात की कोथिंबीर ही ताजी असतानाच वापरून टाकण्याची गोष्ट आहे. जर तुम्ही ते धुवून कोणत्याही प्रकारे साठवले तर ती खराब होईल. कोथिंबीर धुल्यानंतर पंख्याखाली किंवा सूर्यप्रकाशाखाली कोरडे करण्याचा प्रयत्न केला नाही. कोथिंबीर एका दिवसात सुकून जाईल अन्यथा ओलावामुळे सडेल आणि त्याला वास येऊ लागेल. कोथिंबीर कोरडी ठेवणे नेहमीच चांगले असते.
कोथिंबीर कशी स्टोर करावी
कोथिंबीर नेहमी खालचा भाग कापून स्वच्छ असेल ती कोथिंबीर नीट सुकवून स्टोर करावी. कोथिंबीरीच्या दांड्यामध्ये काहीवेळा बुरशी किंवा खराब झालेला असतो. त्यामुळे देखील बाकी कोथिंबीर खराब होण्याची शक्यता आहे. कोथिंबीर सुकल्यानंतर व्यवस्थित बंद डब्यात भरून ठेवावी. उघडी ठेवल्यास किंवा प्लॅस्टिकमध्ये जर हवा राहिली तर ती खराब होऊ शकते.
कोथिंबीर ठेवताना त्यावर मॉइश्चर पकडणार नाही यासाठी काळजी घ्या. पहिलं तर कोथिंबीर ओली राहू देऊ नका. जर तुम्ही बाजारातून आणल्याप्रमाणे 1 आठवड्यानंतरही कोथिंबीर ताजी हवी असेल तर तुम्ही एअर टाइट बॉक्स वापरा. कोथिंबीर कागदात गुंडाळून एका एअर टाइट बॉक्समध्ये ठेवा. ही अशी पद्धत आहे ज्यात कोथिंबीर बराच काळ खरी राहते.
कोथिंबीर साठवताना लोक करत असलेली आणखी एक चूक म्हणजे ते बॉक्समध्ये साठवताना ओलावाची काळजी घेत नाहीत. जर कंटेनर स्वच्छ ठेवला नाही तर त्यात थोडासा ओलावा देखील कोथिंबीर खराब करू शकते. जर तुम्ही बाजारातून जास्त कोथिंबीर खरेदी केली असेल तर या 5 चुका नक्कीच टाळा.