मुंबई : लाल, हिरवी, जलपीनो ढोबळी मिरच्या दिसायला फार आकर्षक दिसतात. पण खास गोष्ट ही की तितक्याच आरोग्यदायी असतात. पोटाचे अल्सर, फ्लू, हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होण्यासाठी ढोबळी मिरची अत्यंत फायदेशीर ठरते. मात्र अनेकांना ही भाजी आवडत नाही. मात्र या आरोग्यदायी फायद्यांसाठी ढोबळी मिरची अवश्य खा...
ढोबळी मिरचीमुळे मेटाबोलिझम सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्याच्या अनेक सप्लीमेंट्स, गोळ्यांमध्ये याचा वापर केला जातो. त्यामुळे आपल्या आहारात विविध रंगी मिरच्यांचा अवश्य समावेश करा.
व्हिटॉमिन सी युक्त ढोबळी मिरचीमुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते. फ्लू, इंफेक्शनपासून संरक्षण होते.
ढोबळी मिरची पोटातील हानीकारक बॅक्टेरीयांपासून वाचवण्यासाठी आणि पोटांचे अल्सर रोखण्यासाठी उपयुक्त ठरते. यामुळे पचन सुधारते आणि अपचनाचा त्रास कमी होतो.
ढोबळी मिरची नाकातील वायुमार्ग साफ करते आणि बंद नाकामुळे होणारा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते.
अभ्यासानुसार, ढोबळी मिरची खाल्याने चाळीस वर्षांच्या वरील व्यक्तींच्या कोंग्निटिव्ह फंक्शन (cognitive function) सुधारणा होण्यास मदत होते.
ढोबळी मिरचीत अॅँटी इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेहापासून बचाव होण्यास मदत होते.