तुमच्या लघवीलाही दुर्गंधी येते का? 'या' रोगाची असू शकतात ही लक्षणं

आपण कधी सर्वजनिक शैचालयात गेलो किंवा त्याच्या बाजून जरी गेलो तरी देखील आपल्याला त्याचा वास येतो. 

Updated: Feb 26, 2022, 03:49 PM IST
तुमच्या लघवीलाही दुर्गंधी येते का? 'या' रोगाची असू शकतात ही लक्षणं title=

मुंबई : आपण कधी सर्वजनिक शैचालयात गेलो किंवा त्याच्या बाजून जरी गेलो तरी देखील आपल्याला त्याचा वास येतो. लोक तेथे लघवी करत असल्यामुळे त्यांच्या युरीनच्या काही काळाने असा वास येतो. जे सामान्य आहे, आपल्याला स्वत: देखील लघवी करताना वास येतो, परंतु हे देखील सहाजिक आहे कारण, हे आपल्या शरीरातील वेस्ट मटेरीयल आहे. परंतु जर लघवीचा जास्त वास येत असेल, तर ते गंभीर आजाराचं लक्षण देखील असू शकतं, त्यामुळे याकडे कधीही दुर्लक्ष करु नका.

अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या आजारांमुळे तुमच्या लघवीतून दुर्गंधी येऊ शकते.

यूटीआय- युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ही महिलांमध्ये आढळणारी एक सामान्य समस्या आहे. जेव्हा जंतू मूत्रसंस्थेला संक्रमित करतात तेव्हा या समस्येचा सामना करावा लागतो. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे मूत्रपिंड, मूत्राशय आणि त्याच्याशी जोडलेल्या नळ्यांवरही परिणाम होऊ शकतो. त्याची वेळीच तपासणी न केल्यास संसर्ग किडनीमध्येही पसरू शकतो.

कमी पाणी पिणे- आपल्या शरीरातील टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर पडतात. अशा परिस्थितीत, जेव्हा आपण पुरेसे पाणी वापरत नाही, तेव्हा हे टाकाऊ पदार्थ सहजासहजी बाहेर पडू शकत नाहीत, ज्यामुळे लघवीला खूप दुर्गंधी येते. तसेच लघवी पिवळी देखील दिसते. अशा परिस्थितीत जास्त प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे.

कॉफीचे अतिसेवन - कॉफीचे जास्त सेवन केल्याने लघवीला दुर्गंधी येऊ शकते. कॉफीमुळे डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते, ज्यामुळे तुमच्या लघवीला दुर्गंधी येऊ शकते.

मधुमेह- ज्या लोकांना मधुमेह आहे आणि त्यांना ते माहीत नसते अशा लोकांच्या लघवीतूनही दुर्गंधी येऊ शकते. मधुमेहामुळे रुग्णांच्या शरीरात साखर पचवता येत नसल्याने असे घडते. त्यामुळे त्यांच्या लघवीला दुर्गंधी येते.

STI- खराब लघवीचे एक मुख्य कारण लैंगिक संक्रमित संसर्ग किंवा STI असू शकते. कधीकधी या संक्रमणांमुळे मूत्रमार्गात जळजळ होऊ शकते ज्यामुळे लघवीचा वास बदलू शकतो. STI व्यतिरिक्त महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जळजळीमुळे लघवीला वास येऊ शकतो.

यीस्ट इन्फेक्शन - कॅन्डिडा नावाची बुरशी सामान्यतः आपल्या त्वचेवर असते. ही बुरशी महिलांच्या खाजगी भागासह शरीराच्या कोणत्याही भागात आढळू शकते. जेव्हा ही बुरशी खूप जास्त प्रमाणात तयार होते, तेव्हा शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात.

ओले कपडे घालणे किंवा घाणीत राहणे हे ही यस्ट इन्फेक्शन वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना यीस्ट इन्फेक्शनच्या समस्येला अधिक सामोरे जावे लागते, ज्यामुळे लघवी करताना दुर्गंधी येते. खाजगी भागात लालसरपणा, सूज आणि पांढरा स्त्राव यांसारखी इतर लक्षणे आहेत. यीस्ट संसर्गाची लक्षणे पुरुषांमध्येही आढळतात, परंतु ती महिलांइतकी तीव्र नसतात.