जेवताना पण मोबाइल वापरताय, आत्ताच मोडा ही सवय; 'या' गंभीर आजारांचा धोका

Smart Phone Hurting Health: जेवताना स्मार्टफोन वापरण्याचे अनेक तोटे आहेत. जेवत असताना फोन वापरल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया सविस्तर

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 25, 2023, 05:05 PM IST
जेवताना पण मोबाइल वापरताय, आत्ताच मोडा ही सवय; 'या' गंभीर आजारांचा धोका title=
health tips in marathi Using Smartphone While Eating Is Dangerous For Health

Smart Phone Hurting Health: खरं तर मोबाईलचा वापर ही एक गरज आहे. पण याच गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे कळलं देखील नाही. स्मार्टफोनचे व्यसन इतके वाढले आहे की अगदी जेवणापर्यंत टॉयलेटमध्येही फोन घेऊन जातात. तासनतास मोबाइलचा वापर जसा डोळ्यांसाठी घातक ठरु शकतो तसाच आरोग्यासाठीही धोकादायक आहे. तरुण पिढीवर मोबाइल वापराचे दुष्परिणाम दिसायला लागले आहेत. जेवतानाही स्मार्टफोनचा वापर हा खतरनाक ठरु शकतो. या सवयीमुळं लोकांचा जेवणाकडे लक्षच लागत नाही. अशावेळी अन्न न चावता व गरजेपेक्षा जास्त जेवल्याने किंवा मोबाइलमध्ये लक्ष असल्याने कमी जेवण करणे, अशा चुका केल्या जातात. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. 

जेवताना मोबाइल वापरल्यास कोणत्या आजारांचा धोका वाढतो हे आज जाणून घेऊया. त्याचबरोबर मोबईलची सवय सोडण्याकरिता काय करता येईल हे देखील जाणून घेऊया. 

जेवताना स्मार्टफोन वापरण्याचे तोटे

डायबिटीज 

जेवताना स्मार्टफोनचा अतिवापर केल्यास मधुमेहाचा धोका वाढू शकतो. कारण जेवताना सगळं लक्ष फोनमध्ये असते त्यामुळं जेवलेल्या जेवण पचत नाही. अशावेळी वजन वाढते आणि मेटाबॉलिज्म स्लो झाल्यामुळं मधुमेहाचा धोका वाढतो. 

लठ्ठपणा

जेवताना पूर्णवेळ फोन वापरल्यामुळं लठ्ठपणा वाढतो. फोनकडेच लक्ष असल्यामुळं भुकेपेक्षा जास्त जेवण करतात. याला ओव्हरइटिंग असे म्हणतात. कधी कधी ओव्हरइटिंगमुळंही लठ्ठपणा वाढतो. 

पचनसंस्थेवर परिणाम

जेवताना फोन वापरल्यामुळं अन्न चावून चावून खाल्लं जात नाही. त्यामुळं डायजेस्टिव्ह ज्यूस योग्य प्रमाणात काम करु शकत नाही आणि त्यामुळं पाचनसंस्था बिगडते आणि त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

काय काळजी घ्याल!

जेवताना पण मोबाइल वापराची सवय लागली असेल तर आत्ताच काळजी घ्या. घरातील सर्व सदस्यांसाठी एक नियम आखून ठेवा. जेवताना डायनिंग टेबलवर किंवा जेवणाच्या खोलीत फोन आणण्यास परवानगी नाही, अशी सक्त ताकिद द्या. 

जेवतानाच घरातील सर्व सदस्य एकत्र असतात अशावेळी तुमचा वेळ मोबाइलमध्ये घालवण्यापेक्षा कुटुंबाला द्या. कुटुंबासोबत दिवसभरात घडलेल्या घटना आणि गमतीजमती सांगा. जेणेकरुन तुमचाही दिवसभराचा ताण हलका होईल. 

जेवतानाही तुम्ही ऑफिसचे काम करत असाल त्यासाठी फोनवर बोलत असाल तर इअरफोनचा वापर करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)