'या' दोन घटकांंच्या मिश्रणाचं तेल दूर करेल केसगळतीची समस्या

सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’चा त्रास सुरू झाला की अनेकांच्या जीवाला घोर लगतो.  केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते. 

Updated: Apr 17, 2018, 04:08 PM IST
'या' दोन घटकांंच्या मिश्रणाचं तेल दूर करेल केसगळतीची समस्या  title=

मुंबई : सौंदर्यांमध्ये ‘केस’ हे फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे ‘केसगळती’चा त्रास सुरू झाला की अनेकांच्या जीवाला घोर लगतो.  केसगळतीचं नेमकं कारण वेळीच जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणजे त्यावर योग्य उपचारपद्धतीने नियंत्रण मिळवता येते. 

बर्‍याच जणांमध्ये केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने केसगळती होते. मग अशांसाठी हीना आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रण नक्कीच फायदेशीर ठरू शकते. केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत

हीना व मोहरीच्या तेलाचे मिश्रण –  

केसांच्या आरोग्यासाठी ‘हीना’ अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांचा पोत सुधारतो तसेच टाळूचेदेखील  पोषण होते. हीनामुळे केसांचे नुकसान टाळण्यास मदत होते.  परिणामी केस चमकदार आणि दाट होतात. 

मोहरीचे तेल अ‍ॅन्टीबॅक्टेरियल आणि अ‍ॅन्टीफंगल असल्याने टाळूवरील इन्फेक्शन कमी करण्यास तसेच डॅन्डरफ ( कोंडा) कमी करण्यास मदत करतात. यामुळे केसगळतीची मूळ कारणंच रोखण्यात मदत होते. परिणामी केसांचे आरोग्य सुधारते.

कसे बनवाल हे मिश्रण ? 

250 ग्रॅम मोहरीचे तेल गरम करा. त्यात 60 ग्रॅम हीना (मेहंदी) ची पानं मिसळून तेल पुरेसे गरम करा. पानं चॉकलेटी रंगाची होईपर्यंत मंद आचेवर तेल गरम करा. थोड्या वेळाने  गॅस बंद करून हे मिश्रण मलमलच्या कापडातून गाळा. आता हे तेलाचे मिश्रण हवाबंद डब्यात झाकून ठेवा. नक्की वाचा : या १० घरगुती उपायांनी केस पुन्हा वाढण्यास मदत होईल!

कसे वापराल तेल ? 

या तेलाच्या मिश्रणाचा नियमित टाळूवर हलका मसाज करा. यामुळे केसगळती रोखण्यास आणि केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी मसाज केल्यानंतर डोक्याला गरम पाण्यात भिजवलेला टॉवेल गुंडाळून ठेवावा. यामुळे तेल डोक्यात झिरपण्यास मदत होते.