मुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल?

लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 4, 2017, 05:11 PM IST
मुलांसाठी डॉक्टर निवडताना काय काळजी घ्याल? title=

मुंबई : लहान मुलांसाठी आजारपण हा काही नवा विषय नाही. त्यामुळे अनेकदा पालक एकच डॉक्टर निवडतात. मग, मुलांचे आजारपण कोणतेही असले तरी, पहिल्यांदा त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला जातो. पण, नेहमी असे डॉक्टर निवडताना काही गोष्टींचा विचार जरूर करायला हवा.

मुलांसाठी डॉक्टर निवडताना त्या डॉक्टरचे शिक्षण, त्याचा स्वभाव, उपचार करण्याची पद्धती, त्यासाठी आकरण्यात येणार फी आदी गोष्टींची माहिती आगोदर घ्या. उपचाराच्या नावाखाली उगीच तो पैसे तर, उकळत नाही ना, याचीही माहिती आगोदरच घ्या. मगच डॉक्टर निवडा. त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्या...

-डॉक्टरांचा दवाखना कुठे आहे. तो घरापासून फार दूर तर नाही ना. तसेच तो सुरू होण्याची आणि बंद होण्याची वेळ माहिती करून घ्या.

- दवाखन्यासोबतच डॉक्टरांच्या घरचाही नंबर सोबत ठेवा. अनेकदा पर्सनल नंबर देणे डॉक्टर टाळतात. पण, किमान डॉक्टरांचा त्वरीत संपर्क होऊ शकेल असा नंबर घेणे केव्हाही चांगले.

- कधीही एकाच डॉक्टरांच्या सल्ल्यावर उपचार करण्यास तयार होऊ नका. शक्यतो दोन तीन डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- डॉक्टरांच्या कोणत्याच चुकीच्या गोष्टीसोबत तडजोड करू नका. तो तुमच्या जीवावर बेतू शकतो. म्हणून नेहमी सतर्क रहा.