सकाळी उठल्यावर करा या पाच गोष्टी..ऐन चाळीशीत स्किन दिसेल हेल्दी

असे केल्याने वयानुसार वाढणारी छिद्रे(पोर्स) बंद होऊ लागतात. थंड पाणी त्वचेसाठी सुरकुत्या प्रतिबंधक म्हणून काम करते आणि त्वचेचे वय कमी करते

Updated: Oct 28, 2022, 09:04 PM IST
सकाळी उठल्यावर करा या पाच गोष्टी..ऐन चाळीशीत स्किन दिसेल हेल्दी  title=

SKINCARE TIPS:  जेव्हा तुम्ही 40च्या जवळ असता तुमच्या चेहऱ्याची स्किनची जास्त काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तसे, प्रत्येकजण रात्री त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला देतो. त्याचसोबत सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यावर तुमच्या स्किन संदर्भात  काही गोष्टी तुम्ही नित्यनेमाने पाळल्या तर चाळीशी नंतरसुद्धा तुमची स्किन हेल्दी दिसू शकते.(healthy skincare routine)
 
चला तर मग जाणून घेऊया मॉर्निंग स्किन केअर रूटीन म्हणजे काय

सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. असे केल्याने वयानुसार वाढणारी छिद्रे(पोर्स) बंद होऊ लागतात. थंड पाणी त्वचेसाठी सुरकुत्या प्रतिबंधक म्हणून काम करते आणि त्वचेचे वय कमी करते. ज्यामुळे तुम्ही बराच काळ तरुण दिसता. यासोबतच थंड पाण्यामुळे त्वचेवर रात्रभर साचलेले अतिरिक्त तेल साफ होण्यास मदत होते. त्यामुळे मुरुम आणि मुरुमांची समस्या कमी होऊ लागते.

पाण्याने चेहरा स्वच्छ करण्यासोबतच टोनरच्या मदतीने टोन करा. यासाठी गुलाबपाणी उत्तम टोनर म्हणून काम करते. गुलाब पाण्याच्या मदतीने त्वचेला फ्रेश करा.  त्यानंतर त्वचेनुसार मॉइश्चरायझर लावा.

भरपूर पाणी पिणंदेखिल तितकचं आवश्यक आहे
सकाळी उठल्यानंतर किमान एक ते दोन ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे आहे.  यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.  हवे असल्यास पाण्यासोबत नारळ पाणी किंवा ग्रीन टी प्या. सकाळी,  त्वचेला ताजेतवाने आणि हायड्रेट करण्यास मदत करतात.

क्लिन्झर म्हणून गुलाबपाणी आणि लिंबापासून बनवलेले सिरम चेहऱ्यावर लावा. त्यात थोडेसे ग्लिसरीन टाकल्याने त्वचा चांगली स्वच्छ होते. तो चेहरा आणि मानेवर लावणं आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावरील घाण साफ होईल.  आणि ग्लिसरीन त्वचेला ओलावा देईल. त्यामुळे त्वचा कोरडी दिसणार नाही आणि त्वचेला दीर्घकाळ तरूण राहण्याची संधी मिळेल.