इडली-डोशाचे पीठ जास्त प्रमाणात आंबवता; ही चूक आरोग्यासाठी ठरु शकते घातक

Kitchen Tips In Marathi: इडली व डोशाचे बॅटर जास्त काळापर्यंत आंबवणे हे शरीरासाठी धोकादायक ठरु शकते. जाणून घेऊया कारणे.

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 11, 2023, 11:30 AM IST
इडली-डोशाचे पीठ जास्त प्रमाणात आंबवता; ही चूक आरोग्यासाठी ठरु शकते घातक title=
kitchen tips in marathi Avoid over fermentation of your idli dosa batter know the reason

Avoid Over Fermentation Of Your Idli Dosa Batter: सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारच्या जेवणात हमखास डइली किंवा डोसा बनवला जातो. इडली- डोशाचे पीठ आंबवण्याची प्रक्रियाही तशी सोप्पी असते. असं म्हणतात जेवढं जास्त पीठ आंबते तेवढी चव वाढते. म्हणूनच पीठ तयार केले की कित्येक दिवस लोक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. एकदा पीठ आंबवल्यानंतरही ते पुन्हा वापरता यावे यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जाते. मात्र, जास्त प्रमाणात पीठ आंबवणे हे शरीरासाठी योग्य असते का? आजच्या या लेखात जाणून घेऊया. 

आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, इडली किंवा डोशाचे पीठ खूप आधीपासून तयार केले असेल आणि त्याला जितक्या जास्तवेळा फरमेंटेशन केले जाते. त्यातील पोषक तत्वे निघून जातात. तसंच, ओव्हर फरमेंटेशन आरोग्यासाठी हानिकारक असते. तसंच, त्याला एक प्रकारचा दुर्गंधीही येतो. 

ओव्हर फरमेंटेड पीठ वापरण्याचे दुष्परिणाम 

डोसा व इडलीचे पीठ जर तुम्ही 10 ते 15 दिवस फ्रीजमध्ये ठेवत असाल तर ही पद्धत अत्यंत चुकीचे आहे. पीठ जास्त प्रमाणात आंबले असेल तर ते आरोग्यासाठी चांगले नाहीये. पीठ जास्त आंबवणे याचा अर्थ ते जास्त प्रमाणात सडवले जाते आणि हिच प्रक्रिया आतड्यांसाठी व लिव्हरसाठी हानिकारक आहे. यामुळं तुमच्या आतड्यांना सूज येऊ शकते. बॅटर जास्त प्रमाणात आंबवणे धोक्याचे आहे. विशेषतः आंबवण्याच्या प्रक्रिया ही गॅसच्या निर्मितीवर  (कार्बन डायऑक्साइड) अवलंबून असते. ब्रेड आणि पॅनकेक्समध्येही हिच प्रक्रिया असते. 

पीठात यीस्टचा वापर- पीठ आंबवण्यासाठी त्यात जर तुम्ही यीस्ट टाकत असाल तर ते अतिप्रमाणात फुलते आणि आंबते. यीस्ट पीठातील सर्व साखर शोषून घेतो आणि त्यामुळं पीठ जास्त फुगते. यामुळं चव नष्ट होते. 

बेकिंग पावडर/ सोडा बॅटर- रासायनिक प्रक्रिया केलेले पदार्थ जसे की बेकिंग पावडर किंवा सोडा वापरुन पीठ आंबवले त्यात गॅसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळं ते ओव्हर फरमेटेंड होतात. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)