Himesh Reshammiya VS Junaid's Loveyapa Box Office Collection : नुकतेच काही चित्रपट हे थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. एकीकडे आमिर खानचा मुलगा जुनैद आणि खुशी कपूरचा 'लवयापा' आणि दुसरीकडे लोकप्रिय गायक हिमेश रेशमियाचा 'बॅडअॅस रवि कुमार' आहे. एकीकडे 'लवयापा' या चित्रपटाचं गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रमोशन सुरु आहे. तर दुसरीकडे इतकं असलं तरी 'बॅडअॅस रवी कुमार' कमाईच्या बाबतीत पुढे जात आहे. चला तर जाणून घेऊया या चित्रपटानं किती कलेक्शन केलं.
2022 मध्ये तमिळमध्ये 'लव टुडे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात मॉडर्न लव्ह स्टोरी होती. चित्रपटाचा लेखकच चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता या चित्रपटाचा हिंदी रीमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचंच टायटल हे 'लवयापा' आहे. ही पटकथा ही दिल्लीमध्ये राहणाऱ्या गौरव आणि बानीची असून इन्स्टाग्रामवर सुरु झालेली भेट, मग डेट आणि त्यानंतर लग्नापर्यंत गेलेल्या प्रवासाची आहे. पण या लग्नासाठी होकार देण्यासाठी बानीचे वडील एक अट ठेवतात, ज्यात गौरव आणि बानीला 24 तासांसाठी आपला फोन एकमेकांना द्यायचा आहे आणि इथूनच सगळा गोंधळ सुरु होतो.
या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या Sacnilk च्या रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटानं 1.25 कोटींचं कलेक्शन केलं. तर अजून या चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन हे अजून समोर आलेलं नाही. हा चित्रपटाचे सगळ्यात जास्त नाईट शो हे लोकं पाहायला जात आहेत. त्यातही जवळपास फक्त 15.77% होते.
हेही वाचा : '...तर मी 1000 वेळा विचार करेन'; समांथासोबत घटस्फोट घेण्यावर नागा चैतन्यनं सोडलं मौन
हिमेश रेशमियाचा चित्रपट 'बॅडअॅस रवी कुमार' ची पटकथा ही एका पोलिसवाल्यावर आधारीत आहे. ज्यात तो या सगळ्या कायद्याच्या बाहेर जाऊन काम करतो. त्याच्या मनात एक चित्र आहे जे तो त्याच्या वास्तविक जीवनातही अनुभवतो. इतकंच नाही तर देशाचे जे सिक्रेट्स आहेत त्याची रक्षा करण्याची मोहिम त्याच्या हाती असते. रवी कुमार या चित्रपटाचा हीरो आहे आणि तो भ्रष्टाचाराला संपवण्याचा काम करतो. या चित्रपटाचा बजेट हा जवळपास 20 कोटी आहे. तर या चित्रपटानं 2.75 कोटींचं कलेक्शन केलं. हा चित्रपट देखील लोकं रात्री जास्त पाहत आहेत. तर त्याची संख्या ही 25.48% आहे.