पिवळ्या टॅक्सीत बसून हात जोडून बनवला व्हिडीओ! बंगालीमध्ये काय म्हणाला विकी कौशल? जाणून घ्या सविस्तर

अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या आगामी 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच त्याने एक बंगाली भाषेतील व्हिडिओ पोस्ट केलाय. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 8, 2025, 06:35 PM IST
पिवळ्या टॅक्सीत बसून हात जोडून बनवला व्हिडीओ! बंगालीमध्ये काय म्हणाला विकी कौशल? जाणून घ्या सविस्तर  title=

Vicky Kaushal Video:  छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेता प्रमोशनसाठी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे पोहोचला आहे. जिथे तो पिवळ्या रंगाच्या टॅक्सीने प्रवास करत होता. अभिनेत्याने टॅक्सी प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

ज्यामध्ये तो पिवळ्या टॅक्सीमध्ये बसून प्रेक्षकांशी बंगाली भाषेत 'छावा' चित्रपट पाहण्यासाठी बोलताना दिसत आहे. त्याने बंगाली भाषेत लोकांना 'छावा' चित्रपट पाहण्याचे आवाहन केलं आहे. 

नेमकं काय म्हणाला विकी कौशल? 

अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की,आनंदाच्या शहरातून एक संदेश! 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये येत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विकी म्हणत आहे की, नमस्कार कोलकाता, माझा 'छावा' हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये येत आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह माझा चित्रपट पाहण्यासाठी जरूर या. यावेळी व्हॅलेंटाईन डे साजरा करू नका, 'छावा' दिन साजरा करा. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सध्या अभिनेता 'छावा' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात पोहोचला होता. जिथे त्याने 'छावा' चित्रपटाला यश मिळण्यासाठी महादेवाचे आशीर्वाद घेतले. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

व्हायरल झालेल्या फोटोमध्ये विकी कौशल मंदिरात पूजा करताना दिसत आहे. ज्यामध्ये त्याने मरुन कुर्ता आणि पांढरा पायजमा परिधान केला आहे. त्यासोबतच त्याने कपाळावर पिवळ्या रंगाचा गंध लावला आहे. विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटात विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अक्षय खन्ना एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेत तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे.