Happy Propose Day : हजारो फूट उंचीवर विमानात पायलटने असं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून तुम्ही पडला प्रेमात

Happy Propose Day : फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना, सगळीकडे प्रेममय वातावरण आहे. सोशल मीडियावरही एक प्रेमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.   

नेहा चौधरी | Updated: Feb 8, 2025, 05:34 PM IST
Happy Propose Day : हजारो फूट उंचीवर विमानात पायलटने असं केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, VIDEO पाहून तुम्ही पडला प्रेमात  title=
Viral Video

Happy Propose Day : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. प्रेमी युगुलांसाठी या महिन्यातील प्रत्येक दिवस खूप खास आहे. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीक सुरु झाला आहे. शनिवार 8 फेब्रुवारी हा प्रपोज डे म्हणून साजरा करण्यात येतो. प्रेमाचे हे क्षण खास करण्यासाठी प्रेमी युगुल अनेक नवीन नवीन आणि हटके गोष्टी करतात. आपल्या कृतीतून बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड आनंदी ठेवण्यासाठी ही पूर्ण प्रयत्न करतात. आपल्या प्रेमाला आनंदी पाहण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करुन संस्मरणीय क्षण व्यतित केले जातात. या व्हॅलेंटाइन वीकमध्ये एका प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण प्रेमात पडला. 

प्रेम असावं तर असं!

या पोस्टमध्ये, एक मेक्सिकन पायलट त्याच्या प्रेयसीला लग्नाचा प्रस्ताव देताना दिसत आहे. प्रेमाने भरलेली ही पोस्ट पाहिल्यानंतर लोक जोरदार कमेंट करत आहेत. व्हायरल पोस्टमध्ये, सुरुवातीला एक महिला विमानात तिच्या डेस्कवर बसलेली दिसते, या दरम्यान मेक्सिकन भाषेत घोषणा होऊ लागते. जेव्हा त्या महिलेला समजते की तिच्यासाठी घोषणा केली जात आहे आणि जेव्हा तिला स्पीकरकडून तिच्या जागेवरून उभे राहण्याचा आदेश मिळतो तेव्हा ती लगेच तिच्या जागेवरून उठते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pubity (@pubity)

यानंतर जे घडले ते खूप सुंदर दृश्य होते. डोक्यावर टोपी घातलेला पायलट त्याच्या मैत्रिणीसमोर येताच गुडघ्यावर बसतो. मग तो त्याच्या खिशातून अंगठीचा बॉक्स काढतो आणि तिला लग्नासाठी प्रपोज करतो. हे सर्व पाहून ती तरुणी इतकी आनंदी होते की तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात. मग दोघेही एकमेकांना मिठी मारतात. हे रील @pubity या हँडलवरून इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहे. आतापर्यंत या पोस्टला 90 हजारांहून अधिक लाईक्स आणि 400 हून अधिक कमेंट्स मिळाल्या आहेत.