टॅटू बनवायचा आहे? होऊ शकतात 'हे' 5 आजार; छोटासा निष्काळजीपणा टाकू शकतो मोठ्या संकटात

Tattoo Side Effects and Risks: टॅटू हा एक फॅशन ट्रेंड बनला आहे, परंतु ते बनवण्यापूर्वी काळजी घेणे फार महत्वाचे आहे. एक छोटासा निष्काळजीपणा तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 8, 2025, 04:39 PM IST
टॅटू बनवायचा आहे? होऊ शकतात 'हे' 5 आजार; छोटासा निष्काळजीपणा टाकू शकतो मोठ्या संकटात  title=

Tattoo Side Effects and Risks: आजकाल टॅटू काढण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. तरुण पिढीला त्यांची स्टाईल आणि व्यक्तिमत्त्व वाढवण्यासाठी टॅटू काढणे आवडते. साधे छोटे टॅटू ते मोठे टॅटू काढले जातात. अगदी साध्य इंकपासून ते रंगबेरंगी टॅटू काढले जातात. आपल्या आठवणी साठवण्याचाही हा एक आगळावेगळा पर्याय आहे. पण टॅटू काढण्याची ही इच्छा तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? योग्य ती खबरदारी न घेतल्यास अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकते. टॅटूमुळे कोणते आजार होऊ शकतात आणि ते कसे टाळता येतील ते जाणून घेऊयात.

1. त्वचेचा संसर्ग

टॅटू करताना वापरल्या जाणाऱ्या सुया, जर योग्य प्रकारे निर्जंतुक केल्या नाहीत तर त्वचेचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे जळजळ, खाज, लाल पुरळ आणि पू यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेक प्रकरणांमध्ये, हा संसर्ग गंभीर होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेवर कायमचे डाग पडतात.

हे ही वाचा: बाजरीची भाकरी खाऊन कंटाळा आला आहे? बनवा लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

 

2. हिपॅटायटीस बी आणि सी

टॅटू काढताना वापरल्या जाणाऱ्या सुया व्यवस्थित स्वच्छ न केल्यास हिपॅटायटीस बी आणि सी सारखेही घातक आजार पसरू शकतात. हे रोग संक्रमित रक्ताद्वारे पसरतात आणि यामुळे यकृत खराब होऊ शकतात. 

3. एचआयव्ही/एड्सचा धोका

जर एचआयव्ही/एड्स बाधित व्यक्तीसाठी वापरण्यात आलेली सुई नीट साफ न करता पुन्हा वापरल्यास एचआयव्ही सारखा घातक आजार पसरण्याचा धोका असतो. अशा केसेस दुर्मिळ आहेत, तरीही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

हे ही वाचा: चॉकलेट, व्हॅनिला सोडा घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी चीजकेक; जाणून घ्या रेसिपी

 

4. ऍलर्जी 

टॅटूमध्ये वापरल्या जाणाऱ्या शाईमुळे कधीकधी त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. यामुळे खाज सुटणे, जळजळ आणि सूज येऊ शकते. काही लोकांना त्वचेवर डाग पडू शकतात. ही समस्या  खूप वाईट दिसते आणि सहज बरी होत नाही.

5. ब्लड इंफेक्शन

चुकीचे टॅटू काढल्याने बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका वाढतो, ज्यामुळे  ब्लड इंफेक्शन होऊ शकते. ही स्थिती अत्यंत गंभीर असू शकते आणि वेळेवर उपचार न केल्यास ते प्राणघातक देखील ठरू शकते.

हे ही वाचा: Fried Rice Recipe: रात्रीचा भात उरलाय? त्यापासून बनवा रेस्टॉरंट स्टाईल फ्राईड राईस, जाणून घ्या सोपी रेसिपी

 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)