Naga Chaitanya on Divorce with Samantha Ruth Prabhu : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य हा गेल्या अनेक दिवसांपासून थंडेल या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर त्या आधी तो चर्चेत असण्याचं कारण शोभित धुलिपालासोबत त्याचं लग्न होतं. जेव्हा त्यानं शोभिताशी लग्न केलं त्यानंतर चर्चा सुरु झाली ती नागा चैतन्यची पहिली पत्नी समांथा रुथ प्रभूची. दरम्यान, नागा चैतन्यनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत समांथासोबत घेतलेल्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे. त्याशिवाय त्यानं म्हटलं की ती आणि मी आम्ही दोघांनी आयुष्यात मुव्ह ऑन केलं आहे पण एकमेकांविषयी आम्हाला खूप आदर आहे.
नागा चैतन्यनं 'रॉ टॉक्स विथ वीके' पॉडकास्टमध्ये समांथासोबत झालेल्या घटस्फोटावर मौन सोडलं आहे. 'आम्हाला विभक्त व्हायचं होतं. आम्ही काही कारणांमुळे हा निर्णय घेतला होता आणि आम्ही एकमेकांचा सन्मान करतो. आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या पद्धतीनं पुढे जात आहोत. त्यापेक्षा जास्त क्लॅरिफिकेशन अजून काय हवंय. तेच मला कळत नाही आहे. मला आशा आहे की प्रेक्षक आणि मीडिया या सगळ्याचा सन्मान करतील. आम्ही प्रायव्हसी मागितली. त्यामुळे आमचा तितका आदर करा आणि या विषयात तरी आम्हाला प्रायव्हसी द्या. पण तरी सुद्धा अडचण एकच आहे की हा आता गप्पांचा विषय झाला आहे. हा सगळ्यांच्या मनोरंजनाचा विषय झाला आहे,' असं नागा चैतन्य म्हणाला.
Akkineni Naga Chaitanya on divorcing Samantha Ruth Prabhu
"I will think 1000 times to break a Relationship."#NagaChaithanya #Samantha#Thandel pic.twitter.com/eGWQpGioFn
— Binge Wire (@BingeWire) February 7, 2025
नागा चैतन्य म्हणाला, 'मी खूप ग्रेसनं आयुष्यात पुढे निघालोय आणि ती सुद्धा तितक्याच ग्रेसनं आयुष्यात पुढे जाते. आम्ही आमचं आयुष्य आमच्या पद्धतीनं जगतोय. मला पुन्हा प्रेम मिळालं. मी खूप आनंदी आहे आणि आमच्या मनात एकमेकांसाठी खूप आदर आहे.'
पुढे प्रेक्षकांशी बोलताना नागा चैतन्य म्हणाला, 'समांथासोबत त्याचे जे डायनॅमिक्स आहेत त्याला घेऊन पॉजिटिव्ह राहा कारण त्याच्या मनात तिच्यासाठी खूप आदर आणि सन्मान आहे. त्यानं सांगितलं की असं काही नाही आहे, हे फक्त माझ्या आयुष्यात होतंय असं नाही, तर मला अपराधीसारखी वागणूक का दिली जाते.'
हेही वाचा : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर
विभक्त होण्याच्या निर्णयावर बोलताना नागा चैतन्य म्हणाला, 'या लग्नात जे कोणी सहभागी झाले होते, त्यांच्या चांगल्यासाठी हा जो काही निर्णय होता तो चांगला होता. हा निर्णय खूप विचार केल्यानंतर घेण्यात आलेला आहे. दुसऱ्या व्यक्तीचा सन्मान करून घेण्यात आलेला आहे. हा निर्णय एका रात्रीत घेण्यात आलेला नाही. मी असं यासाठी बोलतोय, कारण हा माझ्यासाठी खूप जवळचा आणि सेन्सेटिव्ह विषय आहे. मी स्वत: एका विभक्त झालेल्या कुटुंबातून आहे. मी एका विभक्त झालेल्या कुटुंबातला मुलगा आहे. त्यामुळे मला माहित आहे की या सगळ्याचा अनुभव कसा असतो. हे नात तोडण्याआधी मी 1000 वेळा विचार करणार कारण मी त्या कुटुंबाला ओळखतो... हा ठरवून घेतलेला निर्णय होता.'